नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व राजकीय आरक्षण फेटाळल्याने समाजात अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (ता.२१) गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारील पटांगणावर मूक आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलन होत असून पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या मोर्च्याला उपस्थित आहेत.








Esakal