नाशिक : मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळाले पाहिजे यात कुणाचं दुमत नाही, माझ्या पक्षाच्या भूमिकेशी मी एकनिष्ठ आहे. ओबीसी समाजाचे असलेले आरक्षण सुप्रीम करणे नाकारले. मराठा आणि ओबीसी समाजाला (obc reservation) आरक्षण गरजेचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भुमिका मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी मांडली. नाशिकमध्ये आज (ता.२१) खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा मूक आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या मोर्च्याला उपस्थित आहेत. (Maratha-community-should-get-reservation-without-affecting-OBC-reservation-chhagan-bhujbal)

काहींनी माझी आरक्षण विरोधी प्रतिमा निर्माण केली – भुजबळ

शाहू, फुले, आंबेडकर हे आमचे आदर्श आहे आपले उद्दिष्टे एकसमान आहे केंद्राने आकडेवारी दिली तर हे प्रश्न निर्माण होणार नाही, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक आहे. मी कधी आरक्षणाला विरोध केला नाही. मला मात्र काहींनी कायम आरक्षण विरोधी अशी प्रतिमा केली, याप्रश्नी चर्चा करावी लागेल मी सोबतच राहीन. असेही यावेळी भुजबळ म्हणाले

पोलीसांचा फौजफाटा तैनात

नाशिकमध्ये (ता.२१) होणाऱ्या मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी 20 पोलीस अधिकारी आणि 150 कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवली आहे. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या मोर्च्याला उपस्थित आहे. आंदोलनास्थळी प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आंदोलकांची तपासणी करण्यात आली. आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आंदोलना नंतर समन्वयक बैठक घेतली जाणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here