अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.
नुसरतने नुकतेच त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नुसरत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहेत.
फोटोमध्ये नुसरत पांढऱ्या स्वेटशर्ट, जिन्स आणि पिंक शॉलमध्ये दिसत आहेत. नुसरत यांनी फोटोला कॅप्शन दिले, ‘दयाळूपणा सगळं काही बदलून टाकतो.’
19 जून 2019 मध्ये नुसरत यांचे लग्न निखिल जैनसोबत झाले. निखिल आणि नुसरत यांनी तुर्कीमध्ये डेस्‍ट‍िनेशन वेड‍िंग केले. नुसरतने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले होते. तुर्कस्थानमधील कायद्यानुसार नुसरत आणि निखिलचे लग्न झाले. भारतीय कायद्यानुसर हे लग्न वैध नाही. यासर्व गोष्टींमुळे नुसरत आणि निखील यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली.
नुसरत आणि अभिनेता यश दास गुप्ता हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी नुसरत आणि यश सुट्ट्यांसाठी राजस्थानला गेले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here