अभिनेत्री कृतिका गायकवाड नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृतिकाने खास फोटोशूट केले आहे. सर्वांत हटके फोटोशूटमुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोर, मुंबई महापालिका इमारतीसमोर, एशियाटिक लायब्ररीसमोर कृतिकाने योग करताना फोटोशूट केले आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील तिच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. प्रत्येक गोष्ट कलात्मकपणे करणे म्हणजे योग, ही स्वामी कृपालूंची ओळ तिने कॅप्शनमध्ये लिहिली आहे. हे फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमुळे कृतिकाला प्रसिद्धी मिळाली. कृतिकाने ‘बंदिशाळा’ या चित्रपटात ठसकेबाज लावणीने सर्वांचे लक्ष वेधले होते.