सध्याच्या काळात प्रत्येक जण फास्टफूडच्या आहारी गेला आहे. परिणामी, वाढतं वजन, कोलेस्ट्रॉल, मधुमेह यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या समस्यांसोबतच आणखी त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे डबल चीन. वजन वाढल्यामुळे डबल चीन येते असा अनेकांचा समज आहे. मात्र, गळ्या जवळच्या भागात रक्तभिसरण कमी (Blood circulation) झाल्याने डबल चीनची समस्या निर्माण होत असल्याचं सांगण्यात येतं. म्हणूनच, डबल चीन कमी करण्याचे उपाय कोणते ते जाणून घेऊयात.
गळ्याभोवतालच्या भागातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरुळीत झाली की डबल चीनची समस्या दूर होऊ शकते.
पाय गुडघ्यात फोल्ड करुन बसा व मांडीवर हात ठेवा. त्यानंतर शक्य होईल तितकी जीभ बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. हा प्रयोग ५-६ वेळा करावा.
चूळ भरतान ज्या पद्धतीने आपण तोंडात पाणी घेऊन गाल फुगवतो. त्याच पद्धतीने तोंडावाटे हवा आता घ्या व गाल फुगवा चूळ भरल्याप्रमाणे गालांमधील हवा डावीकडे-उजवीकडे खेळवा. दिवसातून ३ ते ४ वेळा हा प्रयोग ३० सेकंदासाठी करा.
फोटो काढताना ज्या पद्धतीने मुली पाऊट करतात. त्या पद्धतीने तोंडाचा पाऊट करावा. यावेळी गळा आतल्या बाजूस थोडा खेचावा. ३० सेकंद या स्थितीत रहावं. हा प्रयोग दिवसातून ३-४ वेळा करावा.
मानवर उचलून तोंडाची १० ते १५ मिनिटांसाठी उघडझाप करा. त्यानंतर मान पुन्हा पूर्ववत स्थितीत आणा. हा प्रयोगदेखील दिवसातून ४ वेळा करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here