चित्रपटांच्या किंवा मालिकांच्या शूटिंगसाठी बराच वेळ एकत्र घालवणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्री होते. अनेकवेळा या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. अशाच काही मराठी कलाकारांबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्येच प्रेम शोधलं.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय आनंद या जोडीला सोशल मीडियावर नेहमी पसंती मिळते.14 वर्षा पूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली. सोनाली आणि विजय यांची पहिली भेट रात होने को है या शोच्या सेटवर झाली. त्या दोघांमध्ये 27 वर्षांचे अंतर आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. एकत्र काम करताना त्यांच्यामधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. निवेदिता आणि अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 1990साली गोव्यामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.
अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेता शांतनु मोघे हे पहिल्यांचा एका मालिकेच्या सेटवर भेटले होते. दोघांनी 2012 साली लग्न केले.
अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेते संजय मोने यांची पहिली भेट ‘ती फुलराणी’ या नाटकाच्या वेळी झाली. त्यानंतर ते कुसुम मनोहर लेले या नाटकामध्ये एकत्र दिसले होते. नाटकामुळे ते दोघे एकमेकांसोबत जास्त वेळ राहात होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा पुण्यातील प्रसिद्ध ‘ढेपे वाडा’ येथे २४ जानेवारीला लग्न सोहळा पार पडला. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादमधील एका शोमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले होते.
‘भेट’ या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची भेट झाली. त्या दोघांनी वादळवाट या मालिकेमध्ये एकत्र काम केले. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रियाने उमेशला लग्नासाठी मागणी घातली.ऑक्टोबर 2011मध्ये दोघांनी लग्न केले . सोशल मीडियावर हे दोघे एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो नेहमी शेअर करत असतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here