रानातील भाज्या या कुठल्याही प्रकारचे बियाणे व खतांचा वापर न करता जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. जंगलातील भाज्या आदिवासींना शेती कामाच्या पावसाळ्याच्या दिवसांत पौष्टिक व परवडणारे खाद्य म्हणून शेतमजुरांच्या खाद्यात मोठया प्रमाणात वापरल्या जातात.

विशेष म्हणजे रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत असते, कठोर मेहनत करून पोटासाठी दोन पैसे मिळवावे लागतात. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नव्वद टक्के समाज हा आदिवासी आहे. हा समाज जंगल खोऱ्यात राहत आहे. त्याला आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी रानमेव्याचा हातभार लागत आहे. रानात दिवसभर फिरून आदिवासी रानभाज्या जमा करतात. या जमा केलेल्या भाज्या त्र्यंबकेश्वर, गिरणारे, हरसूल बाजारपेठेत तसेच वाघेरा घाट व अंबोली घाट रस्त्यात विक्रीसाठी उपलब्ध असतात.

वाघाटा : रानात दिवसभर फिरून आदिवासी रानभाज्या जमा करतात
उळस्याचा मोहर : आदिवासी महिला 10 रुपये वाटा उळस्याचा मोहोर देत असतात
कोरटेल : विना-खताच्या विना बियाण्याच्या वापरामुळे रानातील भाज्यांचे उत्पादन अल्प प्रमाणात मिळत असते
भुईफोड : हरसूलच्या वाघेरा घाटातील जंगलात मोठ्या प्रमाणात वरील भाज्या पावसामुळे मिळत असल्याने आदिवासी भागातील ग्रामास्थांसोबतच बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या शहरी ग्राहकांनाही रान भाज्यांचे मोह पडू लागले आहे
माटाची भाजी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली, हरसूल परिसर बाफनविहीर, खरषेत, कास , खरवळ, गावठा, खरपडी परिसरातील सर्वच आदीवासी पाड्यांना या रानभाज्यां उपलब्ध असतात व विक्रीतून आर्थिक हातभार लागतो.
शेवळा : रान-भाजी मुळातच चांगली व आयुर्वेदिक असल्याने अनेक लोक या भाज्या खरेदी करतात
सोळ भाजी : सध्या बाजारात अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केलेल्या भाज्या उपलब्ध होत असल्याने रान भाज्या जंगलात सहजा-सहजी जंगलात उपलब्ध होत नाहीत

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here