कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गव्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र करवीर तालुक्यातील दयावान श्रीकांत पाटील या युवा शेतकऱ्याने मध संकलनासाठी पेट्या ठेवल्या आहेत. मधमाशांना हानी न होता मध काढला जातो. पावसापासून संरक्षण होण्यासाठी बंदिस्त स्वरूपात पेट्या ठेवल्या जातात. त्यानंतर विविध आकाराच्या बाटल्यात भरून मध विक्रीस ठेवला जातो.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील दयावान श्रीकांत पाटील या युवा शेतकऱ्याने गेल्या दहा वर्षात मध उत्पादनाबरोबरच परागीभवन व शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देत मधमाशा पालनात यश मिळवले आहे.
सुरुवातीचे काही दिवस त्यांनी मधाच्या पेट्या लावून मधाचे उत्पादन सुरू केले, परंतु नैसर्गिक परिस्थितीमुळे अपेक्षित उत्पादन येत नसल्याने त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली.
दर पंधरा दिवसाला एकदा मधाचे संकलन केले जाते. तिथे संकलित केलेला मध घरी आणून त्याचे पाव किलो, अर्धा किलो च्या बाटल्यांमध्ये पॅकिंग केले जाते. मध काढताना कोणतेही रासायनिक पद्धत वापरली जात नाही. यामुळे श्री पाटील यांनी संकलित केलेल्या मधाला नेहमी मागणी असते.
दाजीपूर अभयारण्यात जाऊन वातावरणाची माहिती घेतली. ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे अशा ठिकाणच्या झाडावर या पेट्या लावून मधुमक्षिका पालनास सुरुवात केली. सुरवातीला 10 पेट्या लावून मदत पालनास सुरुवात केली.
सुरुवातीचे काही दिवस त्यांनी मधाच्या पेट्या लावून मधाचे उत्पादन सुरू केले, परंतु नैसर्गिक परिस्थितीमुळे अपेक्षित उत्पादन येत नसल्याने त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली.
पाटील यांनी व्यवसाय वृद्धी करताना यंदा पासून मध पेट्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या कोरोना मुळे कारागीर नसल्याने त्यात नियमितता नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याची विक्री सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. एक पेटी 1800 रुपयांच्या आसपास विकली जाते.
भविष्यात मध पालनासाठी ज्या निविष्टा लागतील त्या देण्याचा त्यांचा विचार आहे. कणेरी मठ, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा खादी बोर्ड डॉ. ए. डी. जाधव यांच्यासह मधा मध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांच्या संपर्कात ते असतात.
कणेरी, शिवाजी विद्यापीठ, दाजीपूर अभयारण्य, राधानगरी भागात एकूण 50 पेट्या आहेत. यातून सहा महिन्याला 400 किलो पर्यंत मधाची विक्री होते. वर्षाला दीड लाख रुपयापर्यंत नफा होतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here