मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही ‘खास’ गोष्टी.

मराठी, हिंदी, तमिळ आणि कान्नड चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
9 ऑक्टोबर 1986 रोजी बडोदा येथे श्रुतीचा जन्म झाला.
त्यानंतर श्रुती आणि तिचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले.
पुण्यातील सेंट मीरा शाळेमधून तिने शालेय शिक्षण पुर्ण केला.
शाळेत असतानाच श्रुतीला अभिनय आणि नृत्याची आवड निर्माण झाली.
10 वी पास झाल्यानंतर तिला अभिनयाची पहिली संधी मिळाली.
स्मिता तळवळकर दिग्दर्शित ‘पेशवाई’ या मालिकेत तिला श्रुतीला अभिनय करण्याची संधी मिळाली.
कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये श्रुतीने भाग घेतला. त्यावेळी तिने अनेक जाहिरातींसाठी मॉडेलिंग केले. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातच करियर करण्याचे ठरवले. त्यासाठी ती मुंबईमध्ये गेली.
सुरूवातीला एका तमिळ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटाचे नाव होते इंदिरा विझा. त्यानंतर अनेक तमिळ चित्रपटांमध्ये तिने काम केले.
हेमा मालिनी या नावाने तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने नाव बदलून श्रुती प्रकाश असे केले होते.
त्यानंतर 2008 साली सनई चौघडे या चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
राधा ही बावरी या मालिकेमध्ये श्रुतीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
4 डिसेंबर 2016 रोजी श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत लग्नगाठ बांधली.
रमा माधव, तप्तपदी, पुणे मुंबई पुणे-2 या चित्रपटांमध्ये श्रुतीने काम केले.
2016 मध्ये बॉलिवूडमध्ये श्रुतीने ‘बुधिया सिंह बॉर्न टू रन’ या हिंदी चित्रपटामध्ये काम करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रुतीने या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारली.
वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी श्रुती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
फोटोशूटचे फोटो आणि व्हिडीओ श्रुती सोशल मीडियावर शेअर करते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here