नंदुरबार : कोविड-१९ (covid-19) मुळे एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू (Parent Death ) झाला असेल अशा १८ वर्षाखालील बालकांना (children) बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी बालकल्याण कक्षामार्फत त्वरीत सामाजिक तपासणी अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड (Collector Dr. Rajendra Bharud) यांनी दिले. ( nandurbar district one hundred and seventy seven corona parent death)

Also Read: कपाशीच्या बीजांकुरावर किटकुलाचा हल्ला; दुबार पेरणीचे संकट

कोविड-१९ संकटकाळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठीत जिल्हास्तरीय कृती दलाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डी.व्ही.हरणे, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी आदी उपस्थित होते.

सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना

डॉ.भारुड म्हणाले, बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. संपर्क न झालेल्या कुटुंबांची माहिती घेऊन त्या कुटुंबाचे सामाजिक सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे. योजनेच्या संदर्भात कोविडमुळे मृत्यू झालेल्या उर्वरीत व्यक्तींची माहिती समितीसमोर सादर करावी. कोविड-१९ मुळे घरातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा. बालगृह किंवा अनुरक्षणगृहात दाखल असलेल्या बालकांची आरोग्य पथकामार्फत नियमित तपासणी करावी.‍

Also Read: महापालिका, पोलिसांपुढे भाजी विक्रेते वरचढ

बालकांची विशेष काळजी घ्यावी

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता अशा बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, उर्वरीत २१ व्यक्तींच्या कुटुंबाशी त्वरीत संपर्क करून माहिती घ्यावी व पात्र बालकांना योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

corona death

लाभ देण्याची कार्यवाही सुरू
जिल्ह्यात कोविड-१९ मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेले ० ते १८ वयोगटातील १ आणि १९ ते ३० वर्ष वयोगटातील ३ मुले आहेत. तर एका पालकाचा मृत्यू झाले असे ० ते १८ वयोगटातील १७७ मुले आहेत. बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी १०२ कुटुंबातील १७७ मुले पात्र असून त्यापैकी १४६ मुलांचे बाल संरक्षण कक्षामार्फत सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या बालकांना तसेच दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे, कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या ९३९ व्यक्तींपैकी ९१८ व्यक्तींची माहिती सादर करण्यात आली. अशी माहिती श्री.वंगारी यांनी दिली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here