सिंधुदुर्ग – दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस आश्वासन दिलं नाही. की स्थगिती दिलेल्या एकाही विकास कामावरील स्थगिती जाताना उठवली नाही. केवळ मी मुख्यमंत्री झालोय हे दाखवून देण्यासाठी उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर येऊन गेल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी कुडाळ मधील पत्रकार परिषदेत केली आहे.
रीफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आदोलन केले. रोजगार उपलब्ध होणे हि चांगली बाब आहे. त्यामुळे या प्रकल्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने होणाऱ्या कोणत्याहि कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे आदोलन कर्त्यानी यावेळी सांगितले.
हेही वाचा– मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना दिले हे वचन..
सत्तेत असून शिवसेनेचा विरोध पण आता
राजापूर तालुक्यातील नाणार गावात रीफायनरी प्रकल्प उभारणार असल्याचे फडणवीस सरकारने जाहिर केले होते. या प्रकल्पला सत्तेत असूनहि शिवसेनेने विरोध केला होता. या विरोधामुळे अखेर तो रद्द करण्याची वेळ फडणवीस सरकार वर आली होती. दरम्यान नाणार वासीयांचा विरोध असल्याने शिवसेनेचा या प्रकल्पला विरोध होता. शिवसेनेचा रीफायनरी प्रकल्पाला विरोध नाहि. तर या उद्योगाला जे जमिन मालक जागा देतील तेथे हा प्रकल्प उभारला जाईल अशी भूमिका शिवसेनेने अलीकड च्या काळात जाहिर केली होती.
हेही वाचा– टॉप हंड्रेड थकबाकीदार झळकणार डिजिटलवर –
स्थानिकांना रोजगारासाठी प्रकल्प महत्वाचा
रीफायनरी च्या समर्थनार्थ 20 जुलै 2019 रोजी रत्नागिरीत मोर्चा काढण्यात आला होता. तर सद्यस्थितीत रीफायनरी साठी सशर्त जमीन देण्यासाठीची लेखी संमतीपत्रे गोळा झाली आहेत. 76.36 एकर जमीन मिळण्याची शक्यता आहे. कोणताहि दर जाहिर न होता. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात संमती मिळणे हि कोकण मधील एक अद्भुत क्रांतिच असल्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे आहे.
सुरूवातीच्या काळात काहि एनजीओ द्वारा प्रकल्पविषयी गैरसमज पसरवले गेले. यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता कंपनीकडुन जनतेमध्ये प्रबोधन करण्यात आले आहे. शिवसैनिकांमध्ये जागृती झाल्याने समर्थन वाढले आहे. स्थानिकांना रोजगार, विकास, यासाठी हा प्रकल्प क्रांतीकारी व आशादायी ठरणारा आहे. असेहि मत व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा– तब्बल १७ वर्षानी घुमणार शड्डूचे आवाज…
धरणे आंदोलन
अंबा, काजू हि कोकणातील रोजगाराची आणि उत्पनाची साधने कमी होत चालली आहेत. भविष्यात या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प फायदेशीर ठरण्याची शक्याता आहे. जमीन उपलब्ध झाल्यास प्रकल्प उभारण्यात येईल या उद्धव ठाकरे याच्या आसनाची आठवण करून देण्यासाठी रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी भेट देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सिंधुदुर्ग मध्ये भेट देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा– हापूसने सोडले तोंडाला पाणी; एका आंब्याची तब्बल एवढी किंमत
मुख्यमंत्र्यानी केला लांबूनच टाटा
कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर या संघटनेच्या झेंडय़ाखाली बसलेल्या सर्व आंदोलकांच्या गळय़ात शिवसेनेचे नाव व धनुष्य बाणाचे चिन्ह असलेले भगवे शेले होते. त्यामुळे शिवसेने च्या भूमिके विरोधात आता शिवसैनिकच रीफायनरी समर्थनार्थ रणांगणात उतरल्याचे चित्र आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांच्या नेतृत्वाखालील या लक्षवेधी आंदोलनात अनेक शिवसैनिक सामील झाले होते.
दरम्यान सिंधुदुर्गात भेट देण्याचा प्रयत्न करतो असे शिवसेना लोकप्रतिनिधा मार्फत आश्वासन मिळाल्याने या ठिकाणी आंदोलनास बसल्याचा दावा आंदोलनकर्त्यानी केला असला तरी मुख्यमंत्र्यानी मात्र त्यांना लांबूनच टाटा करणे पसंत केले. त्यामुळे सद्यस्थितीत ठाकरे यांच्या रीफायनरी प्रकल्पबाबत सकारात्मक भूमिका घेणार की आता हि त्यांचा विरोध कायम राहणार या भूमिकेकडे लक्ष आहे.

News Story Feeds