बिजवडी (सातारा) : माण-खटावचे शिवसेनेचे शेखर गोरे (Shivsena leader Shekhar Gore) कोरोनाच्या (Coronavirus) या लढाईत सहभागी होत माण-खटावच्या कोविड सेंटरना (Maan-Khatav Covid Center) साहित्यरूपी मदत करण्याचे काम करत आहेत. त्यांनी कोरोना बाधितांना (Corona Patient) वेळेवर उपचार होण्यासाठी व कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी दोन रुग्णवाहिका (Ambulance) लोकार्पण केल्या आहेत. या सर्व सोयींनीयुक्त दोन रुग्णवाहिका कोरोनाच्या या जीवघेण्या लढ्यात बाधितांसाठी जीवनदायिनी बनून काम करत आहेत. (Shivsena Leader Shekhar Gore Gave An Ambulance To Covid Center At Maan-Khatav)

माण-खटाव तालुक्यांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतांश लोक या जीवघेण्या रोगाचा सामना करत आहेत.

माण-खटाव तालुक्यांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतांश लोक या जीवघेण्या रोगाचा सामना करत आहेत. यादरम्यान बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही, वेळेवर उपचार होत नाहीत, रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाहीत, अशा कारणामुळे अनेकांचे जीव जात होते. विविध माध्यमांतून कोविड सेंटरना मदत व साहित्य मिळू लागले; परंतु रुग्णवाहिकेचा प्रश्न तसाच होता. शेखर गोरेंनी रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत, यासाठी आई (कै.) कमलताई गोरे यांच्या स्मरणार्थ अनेक वर्षांपासून सर्व सोयींनीयुक्त रुग्णवाहिका लोकार्पण केली होती.

Also Read: कोयनेच्या पावसात शेखर सिंह ओले चिंब; २५ पर्यटकांवर कारवाई

तीच रुग्णवाहिका कोरोनाच्या लढ्यात काम करत होती; परंतु वाढत्या रुग्णांमुळे त्यांच्या सेवेसाठी शेखर गोरेंनी आणखी एक सर्व सोयींनीयुक्त रुग्णवाहिका लोकार्पण करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. त्यांनी दिलेल्या दोन रुग्णवाहिका तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची ने-आण करत आहेत. रुग्ण वेळेवर कोविड सेंटरला पोचत असल्याने त्यांच्यावर वेळेवर उपचार होत आहेत, तर जास्त त्रास होत असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी विविध ठिकाणी ने-आण करण्याचेही कार्य या रुग्णवाहिका करत आहेत. लॉकडाउन काळात वाहने मिळत नसल्याने कोरोनामुक्तीनंतर रुग्णांना घरी पोचवण्याचेही त्या कार्य करत आहेत.

Also Read: आता ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण; साता-यात नियोजन सुरू

Ambulance

कोरोना झाल्यामुळे मला दहिवडी कोविड सेंटरला शेखर गोरेंच्या रुग्णवाहिकेने दाखल केले. कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्यांच्याच रुग्णवाहिकेने मला घरी आणून सोडले. त्यांच्यामुळे माझ्यावर वेळेत उपचार झाल्याने माझे प्राण वाचले.’’

-चांगुणा इंदलकर, उकिर्डे (ता. माण)

कोरोनावरील उपचारासाठी खासगी दवाखान्यात आमच्या नातेवाईकाला दीड लाख रुपयांवर खर्च झाला होता. शेखर गोरेंनी डॉक्टरांना फोन करून बिल कमी करायला लावून उर्वरित बिलासाठीही त्यांनी आर्थिक मदत करत त्यांच्याच रुग्णवाहिकेने कोविड सेंटरलाही नेले व घरीही सोडले.

-सौरभ गायकवाड, तुपेवाडी

Shivsena Leader Shekhar Gore Gave An Ambulance To Covid Center At Maan-Khatav

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here