वाई (जि. सातारा) : शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक बाबींसह इतरही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी आहे. याबाबतची नियमावलीही जाहीर करण्यात आलेली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या सर्वांसाठी पालिकेने (wai muncipal council) ‘टेस्‍टिंग ऑन व्हील्स’ ही मोहीम चालू केली आहे. (satara-wai-covid19-testing-on-wheels-campaign-marathi-news)

साेमवारपासून सुरू झालेल्या मार्केटमुळे शहरातील गर्दीचे वाढते प्रमाण लक्षात घेता बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आजपासून सुरू झालेल्या बाजारपेठेतील कोरोनाप्रसार टाळण्यासाठी पालिकेने जागेवर रॅपिड अॅंटीजेन टेस्टची मोहीम सुरू केली आहे. पालिका कर्मचारी, पोलिस व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

Also Read: तिसरी लाट ओळखून राष्ट्रवादीच्या आमदाराची लढ्यासाठी तयारी सुरु

मास्क न घालणारे (mask) , सोशल डिस्टन्सिंगचे (social distance) पालन न करणाऱ्या व्यक्तींचे तसेच नियम न पाळणाऱ्या दुकानदार व कामगारांचे जागेवर टेस्‍टिंग करण्यात येत आहे. टेस्ट करून पॅाझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना थेट कोविड केअर सेंटर येथे पाठवण्यात येणार आहे. यासाठी पालिकेची रुग्णवाहिका सोबत ठेवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे शहरातील गर्दी वाढली तरी सुपर स्प्रेडर्सकडून होणारा कोरोनाचा प्रसार वेळीच रोखण्यात प्रशासनाला मदत होईल.

याशिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणारे व विनामास्क फिरणारे लोक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेची दोन स्वतंत्र पथके शहरात नियुक्त करण्यात आली आहेत. शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी या पथकांमार्फत कारवाई सुरूच राहणार आहे.

coronavirus

या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरात १५१ चाचण्यांपैकी मुख्य बाजारपेठेत एकूण १०० जणांच्या रॅपिड अॅंटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी दोन भाजी विक्रेते पॅाझिटिव्ह आल्याने त्यांना तत्काळ किसन वीर कोविड केअर सेंटरला पाठविले आहे. यापुढेही ही मोहीम शहराच्या मुख्य रस्त्यांवर तसेच व्यापारी पेठेत सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.

Also Read: पांडवकालीन श्री क्षेत्र मेरुलिंग

काही सुखद बातम्या वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here