‘इंडियन आयडॉल १२’ Indian Idol 12 सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. कधी या शोमध्ये हजेरी लावलेल्या पाहुण्यांच्या टीकेमुळे तर कधी स्पर्धकांच्या एलिमिनेशनमुळे हा शो चर्चेत येतो. रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये या शोमधून स्पर्धक सवाई भट्ट Sawai Bhatt बाद झाला. त्याच्या एलिमिनेशनला सोशल मीडियावर विरोध होत असून पुन्हा एकदा स्पर्धक षण्मुखप्रियाला ट्रोल केलं जातंय. तर दुसरीकडे बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा Navya Naveli Nanda हिनेसुद्धा सवाईच्या एलिमिनेशनवर नाराजी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सवाईचा फोटो शेअर करत नव्याने ही नाराजी व्यक्त केली. (Indian Idol 12 Sawai Bhatts elimination leaves Navya Naveli Nanda heartbroken and emotional)

‘असाच अप्रतिम गात राहा आणि चमकत राहा’, असं लिहित नव्याने काही रडण्याचे इमोजी पोस्ट केले. नव्याचा हा आवडता रिअॅलिटी शो असून याआधीही तिने सोशल मीडियावर या शोसंबंधी पोस्ट केले होते. शनिवारच्या एपिसोडमध्ये सवाईने गायलेल्या ‘बागबान’ या चित्रपटातील गाणं नव्याने शेअर केलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी भूमिका साकारली होती. नव्याचा हा व्हिडीओ सवाई रिपोस्ट केल्यानंतर नव्याने लिहिलं, ‘फॅनगर्ल मूमेंट’! सवाई हा राजस्थानमधील नागौर इथला कठपुतळीचे खेळ करणारा आणि गायक आहे.

Also Read: ‘इंडियन आयडॉल’च्या परिक्षकांना मिळतं तब्बल इतकं मानधन

रविवारच्या एपिसोडनंतर ट्विटरवरही नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त झाली. काहींनी तर शोवर बंदी आणण्याची मागणी केली. ‘सवाईला बाद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. इंडियन आयडॉलवर बंदी आणा’, असे ट्विट्स नेटकऱ्यांनी केले. या शोच्या परीक्षकांवरही चुकीचा निर्णय घेतल्याचा आणि पक्षपातीचा आरोप केला जातोय.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here