कुडाळ (सिंधुदुर्ग) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात कोंकणच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेच योगदान नाही कोकणला मागे घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले आहे या दौऱ्यात सिंधुदुर्गच्या जनतेला पाने पुसून गेले. नाणार प्रकल्पाबाबत एकही शब्द बोलले नाहीत असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत करून स्वतःसह तीन मंत्र्यांना सोबत घेऊन घेतलेल्या बैठकीला मिनी कॅबिनेट म्हणावे का असा सवालही त्यांनी केला. केंद्राच्या परवानगीशिवाय चिपी विमानतळ सुरू होऊ शकत नाही विमानतळाचा प्रकल्प मी आणला आहे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
. हेही वाचा– नाणार प्रकल्प होणार नाहीच- मुख्यमंत्र्यांचा त्या जाहिरातीवर खुलासा
मुख्यमंत्री ठाकरे काही बोलले नाहीत
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या दर्शनाने सुरुवात करून आज दुसऱ्या दिवशी दुपारी चिपी विमानतळला भेट देऊन मुंबईकडे गेले या दोन दिवसांच्या दौऱ्यात कोंकणवासीयांना त्यांनी काय दिले ? दौऱ्यामुळे कोंकणला काय मिळाले? हे जाणून घेण्यासाठी आज श्री राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार राजन तेली आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष ओंकार तेली, संध्या तेरसे, विनायक राणे, राजू राऊळ, आबा धडाम, दिनेश साळगावकर, नागेश परब, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा– टॉप हंड्रेड थकबाकीदार झळकणार डिजिटलवर –
मुख्यमंत्र्यांचा पर्यटन दौरा
श्री राणे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी हेलीकॉप्टर मधून दोन दिवसाचा दौरा केला येथील विकासाचे त्यांना काही सोयरसुतक नाही. हा त्यांचा कोकणच्या विकासाचा दौरा नाही तर पर्यटन दौरा होता. इथे आल्यानंतर मिनी कॅबिनेट घेतली स्वतःसह तीन मत्र्यांच्या सोबत अधिकारी वर्गाबरोबर घेतलेल्या मिनी कॅबिनेटमध्ये कोंकणच्या विकासासाठी काय ठोस निर्णय घेतले याचे उत्तर प्रश्नचिन्हातच आहे.
हेही वाचा– मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना दिले हे वचन..
म्हणून नारायण राणेनी नाराजी व्यक्त केली.
रखडलेल्या कोणत्याच विकासकामांना निधी दिला नाही. जिल्हा पर्यटन झालेला असताना स्वतंत्र पर्यटन महामंडळ का? हा सवाल आहे मिनी कॅबिनेटमध्ये 22 मुद्दे चर्चेला आले कोणत्याही योजनेला पैसे नाही, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, डॉक्टस नाही, टेक्निकल नाही, असे अनेक प्रश्न अनेक योजना बंद स्थितीत असताना ते सुरू करण्यासाठी प्रिय मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय जाहीर का केले नाही ? एकूणच त्यांचा दौरा हा हेलीकॉप्टरमधून फिरण्याचा होता या दौऱ्याच्या निमित्तानं कोकणच्या विकासात त्यांचे कोणतेच योगदान नाही, आता नाही आणि यापूर्वीसुद्धा नव्हते.
चिपी विमानतळ सुरू करणार
दोन दिवसांचा दौरा त्यांनी फिरून वाया घालविला सिंधुदुर्गच्या जनतेला विकासाच्या नावाखाली पाने पुसण्याचे काम मुख्यमंत्री यांनी केले आहे नाणार प्रकल्पाबाबत ते एकही शब्द बोलत नाहीत. रत्नागिरीची बैठक सिंधुदुर्गात घेतली. असे हे मुख्यमंत्री कोकणचा विकास काय साधणार असा सवाल श्री राणे यानी उपस्थित केला. केंद्राच्या परवानगीशिवाय चिपी विमानतळ सुरू होऊ शकत नाही विमानतळाचा प्रकल्प मी आणला आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार. मी विकासासाठी कोणतीही आडमूठी भूमिका घेणार नाही. ज्या काही समस्या आहेत त्या राज्य सरकारच्या माध्यमातून सुटणे आवश्यक आहेत. केंद्रात याबाबत मी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले
.

News Story Feeds