चिपळूण : चिपळूण परिसरात दुर्मिळ व स्थलांतरितांसह सुमारे सव्वादोनशेहून अधिक पक्ष्यांचे वास्तव्य असल्याची भूमिका पक्षी अभ्यासकांनी मांडली. वनविभाग आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्त्वाच्या नोंदी या विषयावरील महत्त्वपूर्ण परिसंवाद घेण्यात आले. यावेळी ही माहिती देण्यात आली.

या वेळी बापट यांनी चिपळूणला चारही बाजूंना डोंगर असल्याने अनेकदा डोंगर माथ्यावरती दिसणारे जैवविविधतेच्या साखळीतील घटक मोठ्या पाण्याच्या प्रवाहासोबत इथल्या खाडीत दिसत असल्याचे सांगितले. आज चिपळूण परिसरात सिमेंटचे जंगल वाढत आहेत. हे चित्र बदलून निसर्ग टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले. पक्ष्यांच्या जवळपास १३०० जाती भारतात, त्यातल्या ६५० जाती महाराष्ट्रात तर चिपळूणच्या आसपास २३० प्रकारचे पक्षी बघायला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Also Read: ओबीसी आरक्षणबाबत चित्रा वाघ आज सिंधुदुर्गात

निसर्ग डायरी कशी लिहायची, यावर बोलताना प्रा. डॉ. हरिदास बाबर यांनी पक्षी व प्राण्यांना कॅलेंडर समजत असल्याचे म्हटले. या नोंदी करताना भागाचे नाव, तारीख, वेळ, तिथले हवामान, तापमान, अधिवास आदी नोंदी कशा करायच्या, हे सांगितले.

तंत्रज्ञान व कलेचा संगम

या वेळी आव्हानात्मक वन्यजीव फोटोग्राफी हा तंत्रज्ञान व कलेचा संगम असल्याचे छायाचित्रकार नयनीश गुढेकर यांनी सांगितले. त्यांनी फाल्कन या दुर्मिळ पक्ष्याचा फोटो मिळवण्यासाठी केलेली ५ वर्षांची मेहनत सर्वांना सांगितली. या परिसंवादामध्ये राज्याच्या विविध भागातील निसर्गप्रेमी, पक्षी अभ्यासकांसह काही परदेशातील अभ्यासक सहभागी झाले होते. आमदार शेखर निकम यांनी या परिसंवादाला शुभेच्छा देताना हा परिसंवाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले.

Also Read: “मनसुखची हत्या वाझे अन् प्रदीप शर्माच्या सांगण्यावरूनच”

थेट घाटमाथ्यावरून कर्नाटककडे रवाना

चिपळुणात ईगल, हॉर्नबिलसारख्या (ककणेर) वर्षानुवर्षे एकत्र जोडीने राहणाऱ्या पक्ष्यांमध्ये गर्भधारणा (ब्रिडिंग) करावी की नाही, अशी मानसिकता निर्माण झाल्याचे सांगून त्यांना प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध रोगांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. काही स्थलांतरित पक्षी कोकणात न येता, थेट घाटमाथ्यावरून कर्नाटककडे रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले.

युरेशियन रायानिक चिपळुणात पहिल्यांदाच

डॉ. श्रीधर जोशी यांनी पक्ष्यांबद्दलच्या गमतीजमती, त्यांचे वागणे, बदलत्या वातावरणात पक्ष्यांच्या विशिष्ट हालचालींसंदर्भात सादरीकरण केले. सात प्रकारचे हेरॉन चिपळूण परिसरात सापडतात, तर युरेशियन रायानिक हा पक्षी चिपळुणात पहिल्यांदा दिसल्याची दुर्मिळ नोंद त्यांनी सांगितली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here