‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत जयदीपची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार जाधव सध्या त्याच्या या मालिकेतील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. मंदारची खऱ्या आयुष्यातील पार्टनर मितिका शर्मा जाधव ही देखील हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मंदारने अलादीन या हिंदी मालिकेमध्ये काम केले होते. 2016 साली मंदार आणि मितिकाने लग्न केले. त्यांना रिदान आणि रेहान ही दोन मुले आहेत. देवो के देव महादेव या मालिकेमध्ये मितिकाने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. मितिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.