चांदोरी (जि.नाशिक) : पहिलं बाळंतपण म्हटलं की सगळं घर डोहाळं जेवणाची तयारी करायला घेतं. पहिल्या बाळंतपणाला गर्भवतीचं डोहाळे जेवण करणं यात तसं काही नवं नाही. पण कधी तुम्ही एखाद्या गाईचं डोहाळं जेवण घातल्याचं ऐकलं किंवा पाहिलं आहे का ? हो हे खरं आहे. निफाड तालुक्यातील गोंडेगाव येथील दाते कुटुंबाने आपल्या लाडक्या गाईचं डोहाळं जेवण घालून संपूर्ण गावासमोर आदर्श उभा केला आहे. (pregnent-cow-baby-shower-ceremony-nashik-marathi-news)

डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली!

पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गाईसाठी एका शेतकऱ्याने आपल्या गाईच्या डोहाळे जेवणाचा आनंद साजरा केला.यासाठी त्यांनी चक्क पाहुण्यांनाही आमंत्रित केलं होतं. गोंडेगावमधील प्रगतशील शेतकरी दादाभाऊ दाते आणि त्यांची पत्नी संगीता यांनी आपली आई रंगुबाई दाते (वय ९६) यांच्या इच्छेनुसार यांनी आपल्या कुटुंबाच्या लाडक्या असलेल्या कपिला गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी त्यांनी जवळच्या २५ लोकांना आमंत्रित केलं. डोहाळे जेवण म्हटलं की,मग नटणं आलंच. या गायीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून सोन्याचे मंगळसुत्र घालून छान नटवण्यात आलं.

७ महिलांनी भरली ओटी

गोडधोड पदार्थांचा घरात घमघमाट सुटला. नातेवाईक डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी दाते यांच्या घरी जमा झाले. डोहाळ कार्यक्रमाची वेळ झाली. कपिलास पडवी मध्ये बांधण्यात आलं. एकएक करत ७ महिलांनी कपिलाची ओटी भरत तिला ओवाळलं.त्यानंतर पाच प्रकारची फळे कपिलाला खाऊ घालण्यात आली. दादाभाऊ दाते यांची गोंडेगाव मध्ये शेती आहे.स्वतःच्या मुलांप्रमाणेच दाते दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात.कपिला गायही आपल्या मुलीसारखीच आहे,असं सांगत गोंडेगावच्या दाते दाम्पत्याने मायेपोटी चक्क कपिला गायीचे डोहाळे पुरवले आणि गोड जेवण दिलं.आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे.पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता. गायीच्या डोहाळ जेवणाचा हा कौतुक सोहळा पार पडला.दाते दाम्पत्याने समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श निर्माण केला.

Also Read: लर्निंग लायसन्स प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास कारवाई

Also Read: हॉलमार्कच्या सक्तीने ग्राहकांना फायदा; बिनधास्त सोने खरेदी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here