

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपड्यांची क्वालिटी. तुम्ही कोणत्याही किंमतीचे कपडे खरेदी करा. पण त्यांची क्वालिटी सगळ्यात आधी चेक करा. अनेकदा महागातील महाग कपडेदेखील लगेच फाटतात किंवा खराब होतात. तर, काही वेळा स्वस्तातील कापड सुद्धा अनेक वर्ष टिकतं. या दोन्ही गोष्टी कापडाच्या क्वालिटीवर अवलंबून आहेत. त्यामुळे कधीही खरेदी करताना प्रथम क्वालिटी चेक करा.

कार्यक्रमानुसार कपड्यांची खरेदी करा. जर लग्नकार्य असेल तर त्यानुसार पारंपरिक कपड्यांची निवड करा. जर ऑफिससाठी किंवा डेली युजसाठी हवे असतील तर कॅज्युअल कपडे निवडा.

कपडे खरेदी करताना तुम्ही त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असाल याची काळजी घ्या. उगाच आवडला किंवा स्वस्तात आहे म्हणून कपडे खरेदी करु नका. जर त्या कपड्यात वावरणं तुम्हाला शक्य असेल तरच ते घ्या.

प्रत्येक ड्रेसच्या मागे तो धुण्याची पद्धत लिहिलेली असते. यात काही कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतले तरी चालतात.किंवा, काही कपडे हातानेच धुवावे लागतात. त्यामुळे कपडे कोणत्या प्रकारचे धुवायचे आहेत ते चेक करा. असं केल्याने कपडे बरीच वर्ष चांगले राहू शकतात.

ऑनलाइन खरेदी करताना कायम प्रथम त्या कपड्यांचा रिव्ह्यू वाचा. त्याचं मटेरीअल, डिटेल्स याची नीट माहिती घ्या. तसंच कायम चांगल्या संकेतस्थळावरुनच कपडे ऑर्डर करा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपड्यांचा रंग जाणार नाही ना याची खात्री करा. अनेकदा गडद रंगाचे कपडे खरेदी केल्यावर त्याचा रंग जातो. त्यामुळे कपडे धुतांना तो रंग अन्य कपड्यांनाही लागतो. त्यामुले कपड्याच्या रंगाची दुकानदाराकडून खात्री करुन घ्या.
Esakal