कोरोना महामारीची साथ सुरू झाली आणि अनेकांनी गड्या आपला गाव बरा म्हणत गाव जवळ केले. सूरज राऊत यांचे बी.कॉम., एलएलबी आणि सीए असे शिक्षण झाले असून ते औरंगाबादेत टॅक्स कन्सलटंट म्हणून काम करतात.
औरंगाबाद : शहरात आधी पूर्णवेळ कर सल्लागार म्हणून स्वत:ची फर्म चालविणारे आणि अर्धवेळ शेतीकडे Agriculture लक्ष देणारे सूरज राऊत कोरोनाकाळात गावी गेले. आता पूर्णवेळ शेती अन् अर्धवेळ शहरात कर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. शेतीला सिंचनाची Irrigation Facility सोय व्हावी म्हणून केलेल्या शेततळ्यात ते आता मत्स्यशेती करित आहेत. त्यातून अनेक टन माशांचे उत्पादन घेतानाच इतरांनाही मत्स्यशेतीसाठी Fish Farming मार्गदर्शन करीत आहेत. एवढेच नव्हे, तर गावातील अनेक तरूणांना यातून रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. कोरोना महामारीची साथ सुरू झाली आणि अनेकांनी गड्या आपला गाव बरा म्हणत गाव जवळ केले. सूरज राऊत यांचे बी.कॉम., एलएलबी आणि सीए असे शिक्षण झाले असून ते औरंगाबादेत Aurangabad टॅक्स कन्सलटंट म्हणून काम करतात. लॉकडाऊन लागल्याने आणि शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने ते त्यांच्या शेंद्र्यापासून जवळच असलेल्या दुधड गावी गेले. वडील भागीनाथ राऊत औरंगाबादमध्येच सहकार खात्यात Cooperative Department नोकरीला असल्याने पूर्ण कुटूंब औरंगाबादमध्येच राहते. त्यामुळे भागीनाथ राऊत आणि सूरज दोघेही सुटीच्या दिवशी गावी जाऊन शेती करायचे. मात्र कोरोनामुळे गावी गेल्यानंतर सुरज यांना शेतीची ओढ वाढली आणि ते आता शेतीकडे जास्त लक्ष देत आहेत. वीस गुंठ्याच्या पॉलिहाऊसमध्ये Polyhouse यशस्वीपणे गुलाबाची फुलशेती Floriculture करत आहेत. Young Man Turn To Fish Farming Due To Corona Aurangabad Live News

Also Read: भाजपच्या प्रदेश सचिवपदी अरविंद पाटील निलंगेकर
मैत्री आली कामाला
सूरज राऊत म्हणाले, वडील नोकरी सांभाळून सुटीच्या दिवशी गावाकडे शेतीत काम करतात. असे १५ वर्ष त्यांनी डाळिंबाचे पिक घेतले. कोरोनाची लाट सुरू झाली आणि मग पूर्ण कुटूंब गावाकडे आले. मग जोवर गावी आहोत तोवर पूर्णपणे शेतीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे पूर्वीपासूनच शेततळे आहे. तीन-चार वर्षांपासून त्याचा सिंचनासाठी वापर करण्याबरोबरच मत्स्यशेती करत. मात्र त्यात ठराविक जातीचेच मत्स्यबीज टाकायचो, त्या मत्स्यशेतीतून म्हणावे तसे उत्पन्न होत नव्हते. गावातीलच साईनाथ चौधरी या तरूण शेतकरी मित्राची साथ लाभली. श्री.चौधरी इंजिनिअरींगला शिकत असताना त्यांच्या आंध्र प्रदेशातील मित्राच्या नातवाईकांची मत्स्यशेती त्यांनी पाहिली. ही शेती कशी करतात याची माहिती घेण्याठी ते काही महिने आंध्रातील मत्स्यशेती करणाऱ्यांकडे राहिले. त्यांच्याकडून मत्स्यशेतीची परिपूर्ण माहिती मिळवली. एवढेच काय, तर माशांच्या हालचालींवरून त्यांना काय झाले आहे, त्यांना कशाची गरज आहे हे ओळखू शकतील एवढा अभ्यास केला. त्यांच्याच मदतीने ही मत्स्यशेती सुरू केली असल्याचे श्री. राऊत म्हणाले.
तोट्यातील मत्स्यशेती फायद्यात
डाळिंब बागेसाठी शेततळे तयार करण्यात आले आहे. मत्स्यशेती प्रोफेशनली आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. पाण्यातील अमोनिया, ऑक्सिजनचे प्रमाण लॅबमधून तपासून घेतले. पाण्याची तपासणी करण्यासाठी फ्रेश वॉटर नावाचे किट घेतले आहे. पाण्याची तपासणी करूनच त्यात औषधी टाकतो. पंकज, रूपचंद आणि चिलाप असे तीन प्रकारचे मत्स्यबीज टाकले. त्यापासून उत्पादन सुरू झाले. पंकज मासा दहा किलो वजनापर्यंत वाढू शकतो. मात्र जेवढा मोठा वाढवू तेवढा खाद्याचा खर्च वाढत जातो. सुरूवात केली तेव्हा २०११-१२ मध्ये सलग दोन-तीन वर्ष मत्स्यशेती तोट्यातच गेली. मात्र नंतर नियोजनबद्ध, शास्त्रशुद्ध पद्धतीने मत्स्यशेती करत असल्यापासून टनाने मासळीचे उत्पादन होत आहे. सध्या पंकज जातीचे १२ हजार मत्स्यबीज सोडले असून यातून १० टन उत्पादन अपेक्षित आहे. हे गोड्या पाण्यातील मासे मुंबई, औरंगाबादच्या बाजारपेठेत पाठवले जात असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.
Also Read: ‘शोले’चा रिमेक अन् संजय राऊत; भाजप नेत्याच्या ट्वीटची चर्चा
मोफत मार्गदर्शन
सूरज राऊत आणि साईनाथ चौधरी स्वत: यशस्वीपणे मत्स्यशेती करत आहेत. त्यातील अनुभव, ज्ञान स्वत:पुरते न ठेवता ते दोघे इतरांनाही मार्गदर्शन करतात. मत्स्यशेतीबाबत कोणीही फोन केला तर त्यांना मोफत मार्गदर्शन करतात. श्री. राऊत म्हणाले, की फोनवर मोफत मार्गदर्शन तर करतोच आणि ते सुरूच राहणार आहे, मात्र, आता काही जण शेततळ्यात मत्स्यबीज सोडण्यापूर्वीच्या तयारीपासून मासा एक किलोचा करेपर्यंत मार्गदर्शन करण्याचा आग्रह करत असल्याने कन्सलटन्सी सुरू केली आहे. या कन्सलटन्सीच्या माध्यमातून ५० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
Esakal