बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो नेहमी शेअर करत असते. नुकतेच ईशाने कफ्तान ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या ड्रेसवर मोत्यांची डिझाइन केलेली आहे.ईशाच्या या प्रिंटेड सिल्क ड्रेसची चर्चा सध्या सुरू आहे.ईशाच्या या ड्रेसची किंमत 15 हजार रूपये आहे. ईशा जन्नत-2, राज 3D, कमांडो-2, रुस्तम , बादशाहो, हमशक्ल्स या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.