जळगाव : इएसआयसी योजने अंतर्गत उपचार (Treatment) व नोंदणीसाठी (Registration) जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावातील एक कुटूंब (Family) जळगावला आले होते. काम अटोपून परत गावाकडे जातांना कुसूंबा-चिंचोली गावा दरम्यान राज्य परिवहन विभागाची सुसाट बसने (ST Buss) दोन्ही दुचाकींना (Two-wheelers) मागुन धडक दिली. या अपघातात (Accident) लिलाबाईसह दुचाकी चालक गजानन किसन बाविस्कर यांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. (buss and two wheelers accident two death)

Also Read: राज्‍यात तीन पक्षांचे सरकार पण त्‍यांच्‍यात संवाद नाही : सदाभाऊ खोत

चिंचखेडा (ता. जामनेर)येथील लिलाबाई धोंडू सोनार (वय४५) या आजारी असल्याने त्यांच्यावर मोठ्या रुग्णालयात उपचार करावा लागणार होता. लिलाबाईचा मुलगा बाळू धोंडू सोनार(वय-३४) हे गाढेगाव (ता.जामनेर) येथील एका कंपनीत कामगार असुन ‘ईएसआयसी’ योजना लागू होती. त्यासाठी कागदपत्रे पुर्ततेसाठी आईला घेवून जळगावी येण्याचे ठरवले होते. बाळूच्या दुचाकीवर पत्नी सुरेखा, लहानभाऊ योगेश असे ट्रिपलसीट आणि मित्र गजानन किसन बाविस्कर याच्या दुचाकी(एम.एच.१९.४०५३) लिलाबाई असे पाचही जण जळगावला आले.

Accident

परतीचा प्रवास झाला जीवघेणा

‘ईएसआयसी’ कार्यालयात कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर तसेच नोंदणीनतर सोनार कुटूंबीय परतीच्या प्रवासाला निघाले. जळगाव-औरंगाबाद रेाडवर कुसूंबागाव ओलांडून चिंचोलीकडे जातांना मागून आलेल्या जळगाव-सोयगाव या सुसाट वेगातील बसने एका मागून एक दोन्ही दुचाकींना धडक दिली. त्यात गजानन बाविस्करसह लिलाबाई सोनार अशा दोघांना बसने चिरडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीलाही धडक बसल्याने तिघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून मात्र बस चालक बस व प्रवासी सोडून पळून गेला.

Also Read: चिकन विक्रेते भिडले; एकमेकांवर केला कोयत्याने वार

मित्राच्या मदतीसाठी आला..
कोरोनामुळे जळगावला येणारे वाहने कमी असल्याने दुचाकीवरून जळगावला येण्याचे बाळू सोनार यांनी ठरवीले. त्यासाठी मित्र गजानन बाविस्कर याला सोबत घेवून गजाननच्या दुचाकीवर आईला बसवीले होते. मात्र परत येत असतांना गजानन व लिलाबाई यांचा अपघाती मृत्यू झाला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here