जळगाव : जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ (Delta Plus) कोविड विषाणूची (Covid virus) लक्षणे असलेले सात रुग्ण आढळून आले आहेत. एकाच कुटुंबातील (Family) हे सातही रुग्ण (Patient) ठणठणीत असून ते सर्वसामान्यांसारखे जीवन जगत आहेत. शिवाय, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवरही आरोग्य यंत्रणेचे (Health system) लक्ष आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (jalgaon district new delta plus virus seven patient found)

Also Read: सुसाट ‘एसटी’ने दुचाकींना उडवीले; दोन जणांचा मृत्यू

याबाबत माहिती देताना जिल्हावासियांनी घाबरुन न जाता खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण हे उपस्थित होते.

Delta Plus

शंभर नमुन्यांची तपासणी
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, कोरोनाच्या विविध तपासण्यांसाठी जिल्ह्यातून दरमहा १०० नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. ज्या सात रुग्णांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळली आहेत ते सर्व ग्रामीण भागातील असून सर्व रुग्ण हे एकाच क्षेत्रातील आहेत. त्यांचे नमुने मे २०२१ मध्ये घेण्यात आले होते.

लक्षणे नसलेले रुग्ण
ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र, या सर्व रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तसेच त्यांचे कोरोना लसीकरणही झालेले नव्हते. त्याचबरोबर त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल न करता ते बरे झाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Also Read:
नंदुरबार जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू

संपर्कातील व्यक्तींवर लक्ष
खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने या सातही रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींची तपासणी केली असून शिवाय ते ज्या भागात राहतात तेथील नागरिकांचीही तपासणी केली आहे. या क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर हा १.२१ टक्के इतकाच असून त्यात कोणतीही वाढ दिसून आलेली नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here