आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय साड्यां विषयी सांगणार आहोत. त्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच ठेवा. आपण कोणत्याही प्रसंगी या प्रकारच्या साड्या नेसून नक्कीच वेगळे दिसू शकता.
केरळा साडी:

केरळची पारंपारिक कासवू साडी दिसायला फारच सुंदर आहे. ही साडी मलई आणि सोनेरी रंगाची असते. कोणत्याही चांगल्या कार्यक्रमात केरळच्या महिला ही साडी नेसून करतात.

चेत्तीनाद सिल्क साडी:

चेट्टीनाड सिल्क साडी तामिळनाडूची पारंपरिक साडी आहे. या साड्या बऱ्याचदा चमकदार आणि गडद रंगाच्या असतात. या साड्या नेसल्या नंतर खूप सुंदर दिसतात .आणि यावरती गजरा ही खूप छान दिसतो.

म्हैसूर सिल्क साडी:

ह्या साड्या दिसायला खूप भारी (जाड)दिसतात. प्रत्यक्षात त्या खूप हलक्या असतात. हलके रंग आणि जाड किनारी असे या साडीचे वैशिष्ट्य आहे. कर्नाटकातील नववधू बहुतेक वेळा या साड्या परिधान करतात.

कांचीपुरम रेशीम साडी:

तमिळनाडूच्या कांचीपुरम साड्या प्रसिद्ध आहेत. ही साडी खूप भारी असते. आपण कोणत्याही मोठ्या फंक्शनला ही साडी वापरू शकतो.

पोचमपल्ली रेशीम साडी

आंध्र प्रदेश मधील ही प्रसिद्ध अशी साडी आहे. हि साडी तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून आणते. आणि तुम्हाला मोहन बनवतात.वेगळा काहीतरी लुक करायचा असेल किंवा सण- समारंभामध्ये तुम्ही साडी परिधान करून स्वतःला वेगळं फिल करू शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here