साउदम्टनच्या मैदानातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलमध्ये भारतीय संघातील खेळाडूंचा एक वेगळाच रंग पाहायला मिळत आहे. कर्णधार विराट कोहलीचा डान्स, बुमराहने जुनी जर्सी घालून मैदानात केलेली एन्ट्रीनंतर मोहम्मद शमीही एका वेगळ्याच अवतारात दिसला. टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमी टॉवेल गुंडाळून फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. (WTC Final India VS New Zealand Mohammed Shami Wears Towel Due To Southampton Cold Weather)

साउदम्टनच्या मैदानात टेस्ट जर्सी आणि लोअरवर टॉवेल गुंडाळून शमी फिल्डिंग करताना पहायला मिळाले. सोशल मीडियावर शमीच्या या अवतारातील फोटो व्हायरल होत आहेत. साउदम्टनच्या मैदानातील थंड वातावरणामुळे शमी टॉवेल गुंडाळून फिल्डिंग करताना दिसला होता. ब्रेकमध्ये तो तसाच ड्रेसिंगरुमच्या दिशेने येतानाही पाहायला मिळाले. विराट कोहलीने त्याच्याकडून सातत्याने गोलंदाजी करुन घेतली. त्यामुळे अंगाला येणार घाम आणि त्यावर होणारा थंडीचा मारा यामुळे शमीने टॉवेलचा आधार घेतल्याचे दिसले.

Also Read: WTC फायनल निकाली लावण्यासाठी गावसकरांकडून ICC ला सल्ला

मोहम्मद शमीचा कमालीचा मारा

पाचव्या दिवशी रॉस टेलरच्या रुपात शमीने संघाला पहिले यश मिळवून दिले. टेलर आणि केन विल्यमसनची जोडी फोडल्याने विकेटचा सिलसिला सुरु झाला. बीजी वॉटलिंग, कॉलीन डी ग्रँडहोम आणि कायले जेमिन्सन यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात शमीने चार गड्यांना बाद केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here