सर्वाधिक गोल डागणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये नेदरलंडच्या दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे. वर्णी लागली आहे. मेम्फिस डेपे याने 237 मिनिटांच्या खेळात दोन गोल डागले आहेत. याशिवाय दोन गोलसाठी त्याने मदतही केलीये.
नेदरलंडचा जॉर्जिनियो विजनलडम या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 270 मिनिटांच्या खेळात 3 गोल डागले आहेत.
बेल्जियमचा स्टार लुकाकू याने 264 मिनिटांच्या खेळात 3 गोल डागले आहेत. तो सर्वाधिक गोल डागणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. चेक प्रजासत्ताकचा पॅट्रिक शिक याने 161 मिनिटांच्या खेळात 3 गोल डागले आहेत. तो गोल्डन बूटच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहेत. युरो कप स्पर्धेत पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वाधिक गोल डागले असून गोल्डन बूटच्या शर्यातीत तो आघाडीवर आहे. त्याने 180 मिनिटांच्या खेळात 3 गोल केले असून 1 गोल असिस्ट केला आहे.