कोरोनापासून आपण सुरक्षित राहिल्यास कुटुंबाचाही धोका कमी होईल, या हेतूने तरूण आता प्रतिबंधित लस टोचण्यासाठी पुढे येत आहेत.

सोलापूर : ग्रामीण भागातील 18 ते 44 वयोगटातील तरूणांना आज पासून (बुधवारी) 94 केंद्रांवरून लस (vaccination) टोचली जाणार आहे. लस टोचून घेणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन बुकिंगची सोय सुरू केली. अक्‍कलकोटमधील काही केंद्रे वगळता जिल्ह्यातील 11 हजार 100 डोसचे बुकिंग अवघ्या दीड तासांतच पूर्ण झाल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली. (vaccination will be carried out at 94 centers in rural areas of solapur)

Also Read: ‘या’ पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

vaccination

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अक्‍कलकोट, मोहोळ, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्‍यांमध्ये मृत्यूदर लक्षणीय होता. कोरोनापासून आपण सुरक्षित राहिल्यास कुटुंबाचाही धोका कमी होईल, या हेतूने तरूण आता प्रतिबंधित लस टोचण्यासाठी पुढे येत आहेत. 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण करताना मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे या वयोगटातील तरूणांना ऑनलाइन बुकिंग बंधनकारक करण्यात आले. आता नियमित त्यांचे लसीकरण सुरू राहणार असून एक दिवस अगोदर नोंदणीसाठी त्यांना वेळ दिली जाणार आहे.

Also Read: सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु

Covid Vaccine

मंगळवारी ऑनलाइन बुकिंगची सोय उपलब्ध करून दिली. त्यावेळी सांगोल्यातील अकोले बु. आणि बार्शीतील नागरी आरोग्य केंद्राचे बुकिंग अवघ्या दहा मिनिटात झाले होते. त्यानंतर उर्वरित 92 केंद्रांवरील शंभर टक्‍के बुकिंग दीड तासात संपले. आतापर्यंत जिल्हाभरातील सहा लाख व्यक्‍तींनी पहिला डोस घेतला असून, त्यापैकी दोन लाखांपर्यंत व्यक्‍तींना दुसरा डोस टोचण्यात आला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत लसीकरणाचे किमान 70 टक्‍के उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केल्याचेही डॉ. पिंपळे म्हणाले.

Also Read: दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले

Vaccination to Children

लसीकरणाचे असे राहणार प्राधान्य

– 18 ते 44 वयोगटातील तरूणांना पहिला डोस

– 45 वर्षांवरील व्यक्‍तींना दुसरा डोस देण्याला राहणार प्राधान्य

– 60 वर्षांवरील व को-मॉर्बिड रुग्णांना दिला जाणार पहिला व दुसरा डोस

– लसीच्या उपलब्धतेनुसार तीन टप्प्यांवर नियमित होणार लसीकरणाचे नियोजन

Also Read: परीक्षेनंतर दोनच दिवसांत निकाल जाहीर! सोलापूर विद्यापीठाची कामगिरी

Vaccination

…तर जागेवरच नोंदणी करून मिळेल लस

जिल्ह्यातील 94 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील तरूणांचे लसीकरण बुधवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. तरीही, एखाद्या केंद्रांवर नोंदणी केलेले तरूण न आल्यास, इतर इच्छुकांना जागेवरच नोंदणी करून लस टोचली जाणार आहे. तशा सूचना संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांना दिल्याचे डॉ. पिंपळे यांनी सांगितले. हे लसीकरण 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे, सहा उपजिल्हा रुग्णालये व 11 ग्रामीण रुग्णालयांमधून होणार आहे.

(vaccination will be carried out at 94 centers in rural areas of solapur)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here