मराठी इंडस्ट्रीतील ‘हँडसम हंक’ अभिनेता भूषण प्रधान सध्या त्याच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
भूषणने नुकतेच त्याचे मोनोक्रोम फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून फोटोंसह त्याच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शॉवरखाली भूषणने हे हॉट फोटोशूट केलं असून त्यावर नेटकऱ्यांसह सेलिब्रिटीसुद्धा लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शॉवरखाली असताना २% गाणी गाणं, ८% अंघोळ करणं आणि उर्वरित ९०% हे आयुष्यातील निर्णय घेतले जातात, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. आत्मविश्वासाने मनातील सर्व शंकांना धुवून टाका, असंही कॅप्शन त्याने एका फोटोला दिलं आहे. समुद्रात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटताना भूषण.भूषण सध्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.