वर्ष २०२० ! हे वर्ष आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एक वेगळं वळण घेऊन येणारं ठरलं. अर्थात याचं कारण म्हणजे कोरोना. जगभरात कोरोना पसरल्यानंतर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्यात. यामध्ये आपलं राहणीमान, आपली काम करण्याची पद्धत, आपल्या सवयी, आपलं जेवण खवणं; अशा एक ना अनेक गोष्टी बदलल्यात.
यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली स्वच्छता आणि आणि सफाई. कोरोना आल्यापासून आपण नियमित हात धुवायला तर लागलोच, सोबतच आपले कपडे, आपलं घर, आपल्या आसपासचा परिसर, सारख्या हात लागणाऱ्या गोष्टी किंवा सार्वजनिक ठिकाणांवरच्या सर्वांचा स्पर्श होणाऱ्या सगळ्या गोष्टी वारंवार स्वच्छ देखील करायला लायलो. अनेकदा आपण असं मजेत म्हणतो देखील, “अरे, लॉकडाऊनमध्ये कुणी साबणाचा किंवा डिटर्जंटचा धंदा सुरु केला असेल, त्याचा धंदा तर एकदम तेजीत नफा कमावून देत असेल.” आज या लेखाच्या माध्यमातून आपण जगभरातील डिटर्जंट व्यवसायाबद्दल, या व्यवसायाच्या परिस्थितीबाबत, येणाऱ्या काळात हा व्यवसाय कुठंवर जाऊ शकतो, या महत्त्वाच्या गोष्टींवर सखोल टाकणार आहोत.
डिटर्जंट मार्केट सध्या कमालीच्या दबावाखाली
भारतीय डिटर्जंट मार्केट सध्या कमालीच्या दबावाखाली काम करताना पाहायला मिळतंय. याला कारण म्हणजे सातत्याने वाढणाऱ्या कच्या मालाच्या किमती आणि त्यामुळे सातत्याने कमी होणारं ऑपरेटिंग मार्जिन.
कोरोनामुळे सध्या डिटर्जंट, लिक्विड सोप, इंडस्ट्रियल क्लीन्झर्स आणि सॅनिटायझर्सची मागणी कमालीची वाढली आहे. यापैकी जवळजवळ प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी एक खास केमिकल लागतं. ज्यामध्ये बेन्झिनचा वापर केला जातो. एकीकडे अल्कल बेन्झिन (Alkyl Benzene) च्या किमती वाढतायत, सोबतच (Sulphonic Acid) लिनिअर अल्कल बेन्झिन सल्फोनिक ऍसिडच्या किमती देखील जागतिक बाजारपेठेत गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतायत. त्यामुळे कोरोनामुळे वाढणारी मागणी आणि सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे कमी होणारा पुरवठा अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते आहे.

बाजारपेठेतील तज्ज्ञ सांगतात…
भारताचा विचार केला तर भारतात आता बऱ्यापैकी लॉकडाऊन उठवला जातोय. अशात आता दुकानं केवळ मर्यादित वेळेसाठी सुरु असतात. अशात सफाईचा वस्तूंची विक्री तुलनेने कमी होताना पाहायला मिळतेय, असं मार्केटचा अभ्यास करणारे तज्ज्ञ म्हणतायत. एकीकडे अशा प्रकारची उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या जसं म्हणजेच हिंदुस्थान युनिलिव्हर किंवा हेनेकेल म्हणतायत त्यांना उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. पण सध्याच्या मार्केटच्या ट्रेंडनुसार ते खरंच ग्राहक येतील का याबद्दल साशंकता देखील व्यक्त करतायत. गॅलेक्सी सरफॅक्टंटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर के के नटराजन यांचं हे म्हणणं आहे. ही कंपनी विविध प्रकारचे सर्फेक्टंट अल्कल बेन्झिन, लिनिअर अल्कल बेन्झिन सल्फोनिक ऍसिड यासारख्या गोष्टींची निर्मिती करते.
कोरोनाचा धोका अजूनही कायम
भारतात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. येत्या काळात भारतात कोरोनाची तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे. अशात कोरोनामुळे महागाई देखील प्रचंड वाढली आहे. अशात एकूणच FMCG कंपन्यांचं म्हणणं असं आहे की, साध्याच भारतीय बाजारपेठेचं वातावरण अत्यंत साशंकतेचं आहे. या कंपन्या पुढील महिना दोन महिने वाट बघून किमती वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याचं येस सिक्युरिटीजच्या हिमांशू नायर यांचं म्हणणं आहे.
भारतीय बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, जेवढ्या लवकर सर्व बाजारपेठा पूर्णतः खुल्या होतील, जेवढ्या लवकर सर्व रेस्टॉरंट्स पूर्ण क्षमतेने सुरु होतील, जेवढ्या लवकर पर्यटन क्षेत्र सुरु होईल, तेंव्हाच भारतात डिटर्जंटच्या मागणीत वाढ होईल. मात्र किती वेगाने सर्व पुन्हा सर्वकाही पूर्ववत होईल वावर मात्र साशंकता असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

गेल्या आठ आठवड्यांमध्ये वाढल्यात किमती
कमोडिटीच्या किमतींवर सातत्याने लक्ष ठेवणाऱ्या ICIS या कंपनीने एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या रिपोर्टनुसार गेल्या आठ आठवड्यांचा विचार केल्यास केवळ लिनिअर अल्कल बेन्झिनच्या किमती $1,600 ते $1,650 प्रति टन वरून $1,810 ते $1,910 प्रति टन इतक्या वाढल्या आहेत. भारतात मान्सून सुरु झालाय. या काळात विविध आजार पसरण्याची शक्यता असते, अशात या उत्पादनांची मागणी टाकून रनर असल्याचं देखील सांगितलं जातंय.
घरगुती बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे या उत्पादनाच्या किमतीवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. गेल्या काही आठवड्यांमध्ये डिटर्जंट बनवण्याची किंमत आणि त्यांची डिस्ट्रिब्युटर किंमत यामध्ये तब्बल ३.५ पटीने वाढ झाली आहे असं देखील तज्ज्ञ सांगतात.
मागणी आणि पुरवठ्यात तफावत
एकीकडे अल्कल बेन्झिन (Alkyl Benzene) आणि लिनिअर अल्कल बेन्झिन सल्फोनिक ऍसिड यांच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत आहेच. त्यामुळे येत्या काही काळात सदर उत्पादनाच्या किमती चढ्याच राहण्याची शक्यता असल्याचं गॅलेक्सी सर्फेक्टंटचे के के नटराजन म्हणतात.
भारतीय कंपन्यांचं वर्चस्व
जागतिक बाजारपेठेत हा कच्चा माल पुरवणाऱ्या काही भारतीय कंपन्यांचं वर्चस्व आहे. यामध्ये तामिळनाडू पेट्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, अल्ट्रामारिन अँड पिग्मेंट्स लिमिटेड तसेच बोडल केमिकल्स लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होतो. त्यामुळे येत्या काळात तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या डिटर्जंट किंवा लिक्विड सोप यांच्या किमती वाढणार हे मात्र पक्कं.
Esakal