नाशिक : काही वर्षांपूर्वी विकास म्हणजे काय हे माहित नसणारं एक अख्खं गाव गुलाबी रंगात रंगलंय. सुरगाणा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातलं हे गाव. खरं तर एका शिक्षकाची या गावात बदली झाली आणि हे गाव गुलाबी झालं. काय आहे या गावाचं गुलाबी गुपित?

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यात भिंतघर गावातील गुलाबी गाव! अतिदुर्गम डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं हे टुमदार गाव. या गावाचे रुपडं पालटलं ते शिक्षक जितेंद्र गवळी यांनी
मुलींनी शिकावं आणि गावात महिलांचा आदर वाढावा म्हणून गुलाबी गावाची आयडिया पुढे आली. गावानंही गुरुजींना साथ दिली. आणि पाहता पाहता गावातली सगळी घरं गुलाबी झाली.
येथील पालकांना मुली शाळेत पाठवण्याची प्रेरणा मिळत राहिली. आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून हे संपूर्ण गाव पिंक व्हिलेज म्हणून तयार केले. हे गाव जसं जयपुर पिंक सिटी प्रमाणेच राज्यात नावारूपाला आले.
जवळपास ८० कुटुंबं आणि ४०० लोकसंख्या असलेलं हे भिंतघर राज्यातलं पहिलं गुलाबी गाव ठरले आहे. गावात नीटनेटके रस्ते, एक घर एक झाड. प्रत्येक घरासमोर पक्षांसाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात दारूबंदीही करण्यात आलीयत.
पूर्वी हे गाव हिरमाळ म्हणून ओळखले जायचे एकाने दगडाची भिंत बांधली त्यामुळे गावाचे नाव भिंतघर नाव गावकऱ्यांच्या एकाकीतून हे गुलाबी गाव उभे राहिले. या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. गावकऱ्यांना आनंद झाला

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here