ICC World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) याच्यांत सादम्टनच्या मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येत आहे. पाऊस आणि अंधूक प्रकाश यामुळे नियोजित पाच दिवसांचा खेळ राखीव दिवसात भरुन काढण्यात येणार आहे. राखीव दिवशी सामन्यााच निकाल कोणत्याही बाजूला झुकू शकतो. भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या जसप्रित बुमराहला नावाला साजेसा खेळ करता आला नाही.

यॉर्कर स्पेशलिस्ट बुमराहला न्यूझीलंडच्या पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही. आयसीसीच्या नॉक आउट स्टेजमध्ये बुमराहची सुमार कामगिरी पाहायला मिळण्याची ही पहिली वेळ नाही. 2016 च्या वर्ल्ड टी 20 स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये आणि 2017 च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बुहमराला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हती. परिणामी टीम इंडियावर सामना गमावण्याची वेळ आली होती.

Also Read: VIDEO : साउदीच्या उसळत्या चेंडूवर विराट गडबडला!

ICC च्या नॉक आउटमध्ये बुमराह नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी

जसप्रित बुमराहची (Jasprit bumrah) आयसीसी इव्हेंटच्या नॉक आउटमधील कामगिरी निराशजनक राहिली आहे. 2016 मध्ये तो वेस्ट इंडिंज विरुद्धच्या सामन्यात पहिला नॉक आउट सामना खेळला. टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये बुमराहने आपल्या 4 ओव्हर्सच्या कोट्यात 42 धावा खर्च केल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. या सामन्यात बुमराने 6 चौकार आणि 2 षटकारही दिले होते. या सामन्यात 192 धावा करुनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही जसप्रित बुमराह चांगलाच महागडा ठरला होता. फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने 9 षटकात 68 धावा खर्च केल्या होत्या. आपल्या स्पेलमध्ये त्याने फखर झमानची विकेट घेतली पण नोबॉलमुळे त्याला एक संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा उठवत शतकी खेळी केली. यावेळी नो बॉलवरून बुमराह चांगलाच ट्रोल झाला होता.

Also Read: VIDEO : गिल झाला ‘सुपर मॅन’, टेलरचा घेतला अफलातून कॅच

2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपवेळी देखील बुमराह फेल ठरला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये बुमराह तिसऱ्यांदा आयसीसीच्या मोठ्या इव्हेंटमधील नॉक आउटमध्ये खेळताना दिसले. 10 षटकात त्याने 39 धावा खर्च करुन 1 विकेट घेतली. रविंद्र जडेजाने त्याच्यापेक्षा चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या बुमराहने मॅचला कलाटणी देऊन संघाला विजयात मोलाचा वाटा उचलल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्यामुळे दबावात चांगली कामगिरी करण्याची त्याच्यातील क्षमताही सिद्ध झालीये. पण मुंबईचा हिरोत आयसीसी इव्हेंटमध्ये मोक्याच्या क्षणी अपयशी ठरतोय. त्याचे अपयश टीम इंडियाच्या अपयशात बदलल्याचेही पाहयला मिळाले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here