बॉलीवूडची पंगा गर्ल (bollywood panga girl) म्हणून कंगना प्रसिद्ध (actress kangana ranaut) आहे. ती आपल्या वाचाळपणासाठीही ओळखली जाते. असं कोणतं क्षेत्र नाही की त्यात कंगनानं आपलं मत मांडलेलं नाही. आताही ती तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कंगनाला आपल्या परखड प्रतिक्रियेची किंमत चूकवावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे दोन समुहांमध्ये धार्मिक संघर्ष होण्याची भीती होती. या कारणास्तव तिचं व्टिटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. मात्र त्याचा कुठलाच परिणाम तिच्यावर झाला नाही. (actress kangana ranaut india name to change as bharat)
राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर वेगवेगळ्या प्रकारे कंगना (kangana) आपली मतं मांडत असते. त्याला तिच्या चाहत्यांचा प्रतिसादही मिळतो. आता कंगनानं देशाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ती अनेकांच्या ट्रोलचा विषय झाली आहे. कंगनाचं असं म्हणणं आहे की, इंडिया (india) असे न म्हणता भारत (bharat) म्हणावे. इंडिया हे नाव ब्रिटिशांनी ठेवले होते. आणि हे नाव गुलामीची ओळख आहे. इंस्टावर कंगनाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते आहे.

कंगनानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, भारत आणि इंडिया यांच्यात फरक आहे. भारताची व्याख्या सांगताना तिनं संस्कृत भाषेचा आधार घेतला आहे. भारत हा एक संस्कृत शब्द आहे. भ पासून भाव, र पासून राग आणि त पासून ताल असा अर्थ आपल्याला सापडतो. याबरोबर तिनं इंडिय़ा या शब्दावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत तेव्हाच सर्वात पुढे जाईल जेव्हा आपण भारताच्या प्राचीन संस्कृतीवर विश्वास ठेऊ. आणि त्याचा आदर करु. यापुढे भारतीय लोकांनी आपल्या वेद, पुराण आणि योग यांच्याशी स्वताला जोडण्याची गरज आहे.
Also Read: ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर आगळीवेगळी वटपौर्णिमा
https://www.youtube.com/watch?v=XbTC2GhesC0जेव्हा ब्रिटिशांनी इंडिया हे नाव दिले तेव्हा आपण गुलाम होतो. आणि हे नाव त्याच गुलामीचे प्रतिक आहे. प्रत्येक नावाचा काही ना काही अर्थ असतो. ब्रिटिशांना हे माहिती होत. त्यामुळे त्यांनी केवळ जागेची नावं बदलली नाहीत तर वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणांचीही नावं बदलली. त्यामुळे भारत हेच नाव आपण ठेवण्याची गरज असल्याचे कंगनानं सांगितलं आहे.
Esakal