अनेकदा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींना त्यांच्या वजनामुळे ट्रोल केले जाते. सौंदर्याची नवी व्याख्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक हिने या ट्रोलर्सना सांगितली आहे.

अक्षया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते.
अक्षयाच्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
आपल्या शरिराची लाज न बाळगता, स्वत:वर प्रेम केले पाहिजे असा संदेश ती मालिकेमधील लतिका या भूमिकेमधून देते. पण खऱ्या आयुष्यात देखील हाच विचार करून अक्षया जगते हे तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून लक्षात येते.
‘ढाई किलो प्रेम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ये रिश्ते है प्यार के’ या हिंदी मालिकांमध्ये अक्षयाने काम केले आहे.
साडी असो वा ड्रेस अक्षयाच्या प्रत्येक लूकला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.
अक्षयाचे सोशल मीडियावरील डान्स रिल्स देखील व्हायरल होत असतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here