कात्रज (ता. २३) : हवेली तालुक्यातील कोंढवा येवलेवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध हवेली महसूल पथकाने धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आज (ता. २३) वाळूने भरलेली ०७ आणि ०१ रिकामे वाहन ताब्यात घेतले आहे. तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी भल्या पहाटे ही कारवाई केल्याने वाळूतस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.(raids on sand smugglers by Haveli Tehsildar)

बुधवारी (ता. 23) पहाटे सकाळी ०६ वाजता हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, खेड शिवापूर मंडलाधिकारी सुर्यंकांत पाटील, विकास फुके, सुर्यकांत काळे, आरती खरे, कल्याणी कुडाळ, प्रविण घुले, पांडूरंग चव्हाण आदींच्या भरारी कोंढव्यातील इस्कॉन मंदिरानजीक चार अनाधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडले. तर येवलेवाडी येथे वाळू घेण्याकरिता आलेले तीन मातीमिश्रित वाळूचे ट्रक पकडण्यात आले आहेत. दरम्यान, या वाळू तस्करांवर गुन्हे नोंद करण्यात येणार असून त्यासंबंधी भारती विद्यापीठ पोलिसांत पत्र देण्यात आल्याची माहिती सुर्यंकांत पाटील यांनी दिली.

Also Read: पुणे : शोधत होते सरकारने नेमलेली कंपनी; सापडले मुलींचे वसतीगृह

कोंढवा-येवलेवाडी परिसरात रात्री-अपरात्री हायवा, ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असून संबंधित वाळूतस्करांवर कारवाई झाल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईत एकूण ७ वाहनांमधील अंदाजे २५ ते ३० ब्रास मातीमिश्रीत वाळू ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेले वाळूचे ट्रक हे आंबेगांवमधील शिवसृष्टीजवळ असणाऱ्या रिकाम्या जागेत लावण्यात आले आहेत.

कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कारवाई केल्यास चालक गाडी जाग्यावर सोडून फरार होतात किंवा गाडीची वायरिंग कट करणे, फ्यूज काढून घेणे, गाडीत बिघाड करुन ठेवणे अशा गोष्टी तत्परतने करतात. त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने गाडी दुसऱ्या जागी घेऊन जावे लागते. गाडी ताब्यात घेतल्यास प्रशासनाकडे गाड्या लावण्यांसाठी जागा नसल्याने गाड्या कुठे लावायचा हा प्रश्न निर्माण होतो.

Also Read: रक्ताने ‘सॉरी मॉम’ लिहून पुणे पोलिसाची आत्महत्या

”अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कुठलीही हलगर्जी होणार नाही. त्यामुळे अशा कारवाया होत राहतील. वाळू तष्करांनी इथून पुढे दंडात्मक कारवाईसाठी तयार राहावे.”

– तृप्ती कोलते पाटील, तहसिलदार हवेली तालुका

कारवाई करण्यात आलेल्या वाहनाचा क्रमांक आणि मालकाचे नाव

१) अभिजीत मनोहर शिळीमकर – एमएच १२ केक्यू ९४५६

२) संतोष माधवराव मुंडे – एमएच १२ डीटी ८२७७

३) परमेश्वर बालाजी गु्ट्टे – एमएच १२ एफसी ८५६४

४) गणेश महाडिक – एमएच ४२ टी ७४८०

५) महादेव सोलंकर – एमएच १२ एफझेड ४३७१

६) राहूल लक्ष्मम जगताप – एमएच १२ बी ९६३७

७) प्रल्हाद जायभाय – एमएच १४ एएस ८६६३

८) सागर सज्जन पाटील – एमएच १२ ईएफ ३५७७

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here