विरोधी पक्षनेते आणि बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची माहिती
मुंबई: तौक्ते चक्रीवादळात (Cyclone Tauktae) नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना (Fishermen) अल्पदारात कर्ज (Loans) उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबै बॅंक प्रयत्न करेल, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे मच्छिमारांना बिनातारण कृषी कर्जाप्रमाणे तीन लाखांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठीचा विषय राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाकडे पाठविला जाईल. तसेच तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या मोठ्या बोटींच्या (Boats) मालकांना पंतप्रधान मत्स्य योजनेमार्फत अनुदान मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही दरेकर यांनी सांगितले. (BJP Pravin Darekar says Mumbai Bank will help those affected in Cyclone Tauktae)
Also Read: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला NCBने घेतलं ताब्यात

कोळी महाराष्ट्र संघ व महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची आपल्या मागण्यांसाठी भेट घेतली. यावेळी आमदार प्रसाद लाड आणि इतर मंडळी उपस्थित होते. राज्यातील विविध मच्छिमार संघटनांच्या बहुतांश सदस्यांची बॅंक खाती ही मुंबई बॅंकेत आहेत. त्यामुळे या सदस्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करण्यात येईल असेही दरकेर यांनी स्पष्ट केले. शेतक-यांना पिकांसाठी, बियाणांसाठी बिन तारण कर्ज उपलब्ध होते, त्याप्रमाणे मासेमारी करणा-या मच्छिमारांनाही या धोरणाचा लाभ मिळावा व मच्छिमार बांधावानाही किमान तीन लाख रुपयांचे कर्ज विनातारण उपलब्ध व्हावे यांसदर्भात चर्चा करण्यात आली. हा विषय राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाकडे मांडण्यात येईल असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
Also Read: ‘हे संपूर्णत: चुकीचं’; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आव्हाडांची प्रतिक्रिया

तौक्ते चक्रिवादळात मच्छिमारांच्या लहानमोठ्या बोटींचे नुकसान झाले आहे. यातील मोठया बोटींना केंद्राच्या पंतप्रधान मत्स्य योजनेमार्फत लाभ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. प्रकल्पाची उर्वरित रक्कम मुंबई जिल्हा बँक उपलब्ध करून देईल. मुंबईत पूर्णपणे निकामी झालेल्या 51 बोटींच्या मालकांना नव्या बोटींसाठी सहा ते सात कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची व्यवस्थाही मुंबई बँक करेल, असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले. तौक्ते वादळात मच्छिमारांचे मोठे नुकसान होऊनही राज्यसरकारकडुन तुटपुंज आर्थिक मदत जाहीर केली गेली आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
Esakal