पुणे : पुणे-मुंबई मार्गावर शनिवारपासून (ता. २६) डेक्कन एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यात आधुनिक सुविधा असलेला एक विस्टाडोम कोच असेल. त्यामुळे प्रवासादरम्यान निसर्ग सौंदर्याचा आस्वादही प्रवाशांना घेता येईल. मात्र, त्यासाठी थोडीशी जादा रक्कमही प्रवाशांना मोजावी लागेल. डेक्कन एक्स्प्रेसचा शेवटचा डबा म्हणजे विस्टाडोम कोच असेल. मोठ्या खिडक्या, काचेचे छत, फिरणारी पुश-बॅक खुर्ची आदी सुविधांचा समावेश असलेल्या कोचमध्ये प्रवाशांना उभे राहूनही प्रवासाचा आनंद घेता येईल. त्या ठिकाणी तिन्ही बाजूने काचा असतील. मध्य रेल्वेत विस्टाडोमचे दोनच कोच आले आहेत. त्यातील एक डेक्कन एक्स्प्रेसला जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दुसरा कोच मुंबई-मडगाव मार्गावरील जन्मशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. (The-Deccan-Express-will-run-on-the-Pune-Mumbai-route-from-Saturday)
ही गाडी दिवसा धावणार असल्यामुळे फोटो टिपत निसर्ग न्याहाळत प्रवास होऊ शकतो. डेक्कन एक्स्प्रेसला १५ डबे असतील. त्यात तीन एसी चेअरकार, ११ सेकंद क्लास सिटिंग आणि विस्टाडोम कोच असेल. प्रवाशांना विस्टाडोम कोचमध्ये बसायचे असेल तर त्याचे आरक्षण करावे लागेल. त्यासाठी इतर डब्यांच्या तुलनेत अधिक भाडे असेल. मोठ्या खिडक्या, काचेचे छत, फिरणारी पुश-बॅक खुर्ची आदी सुविधांचा समावेश असलेल्या कोचमध्ये प्रवाशांना उभे राहूनही प्रवासाचा आनंद घेता येईल.डेक्कन एक्स्प्रेसचा शेवटचा डबा म्हणजे विस्टाडोम कोच असेल. तिन्ही बाजूने काचा असतीलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ७ वाजता ही गाडी निघेल आणि सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. पुण्यावरून ही गाडी (क्र. ०१००८) दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी निघेल आणि सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मुंबईला पोहोचेल. दादर, ठाणे, कल्याण, नेरळ, लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजीनगर स्थानकांवर ही गाडी थांबेल.