दिवसागणिक रूग्णसंख्या वाढत चालल्याने कोविड सेंटरवर ताण येत आहे. आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये साधनसुचितेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे प्रशासन हतबल होत असल्याचे चित्र आहे.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : कोरोना Corona संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पेठसांगवी (ता.उमरगा) Umarga येथील तरुण बांधकाम व्यावसायिक महेश देशमुख यांनी विविध कोविड केअर सेंटरला सुमारे साडेतीन लाख रोख रक्कमेसह अन्नधान्याचे वितरण करून सामाजिक भान जपत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. परिणामी राज्यासह देशात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर Covid Care Centre उभारून बाधित रूग्णांवर उपचार केले जात आहेत. दिवसागणिक रूग्णसंख्या वाढत चालल्याने कोविड सेंटरवर ताण येत आहे. आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये साधनसुचितेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे प्रशासन हतबल होत असल्याचे चित्र आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत पेठसांगवी येथील महेश देशमुख हा तरूण व्यावसायिक आरोग्य विभागाच्या व बाधित रूग्णांच्या मदतीसाठी धावून आला आहे. श्री.देशमुख हे विविध ठिकाणी सुरू Osmanabad असलेल्या कोविड सेंटरला मदत करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी साडेतीन लाख रूपयांची मदत केली आहे. यात पारनेर (जि.अहमदनगर) येथील निलेश लंके Nilesh Lanke प्रतिष्ठान कोविड सेंटरला एक लाख रूपयांची आर्थिक मदत दिली. या शिवाय रूग्णांसाठी १० टन कोलम तांदूळ, ५० हजार अंडेही उपलब्ध करून दिले. तसेच उमरगा येथील माऊली प्रतिष्ठान कोविड सेंटरलाही त्यांनी एक लाख रुपये तर ईदगाह कोविड सेंटरला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.osmanabad news youth donate amount with grains to covid centres

महेश देशमुख

Also Read: ‘एमआयएम’चा पहिला महापौर औरंगाबादमधून, इम्तियाज जलीलांना विश्वास

या त्यांच्या आर्थिक मदतीमुळे आरोग्य विभागाला Health Department बळकटी मिळात आहे. याचबरोबर श्री.देशमुख यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पेठसांगवी येथे विविध जातींच्या ३०० वृक्षांची लागवड करून झाडांचे संगोपण करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी माजी सरपंच सदानंद बिराजदार, पंचायत समिती सदस्य बसवराज शिंदे, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष दत्तू राऊत, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, पोलिस पाटील ईश्वर सुरवसे, माजी सरपंच राजेंद्र सुरवसे, गंगाराम माळी, संजय दलाल, सिद्धाप्पा महाजन, महादेव माळी, महादेव घोडके, ज्ञानराज देशमुख, विजयकुमार देशमुख, गोरख बनसोडे, दयानंद बनसोडे, रमेश पंचमहाल, मोहद्दीन शेख, अहमद तांबोळी, संतोष बिराजदार आदी उपस्थित होते.

Also Read: ओबीसींसाठी भुजबळ,वडेट्टीवारांनी राजीमाने द्यावेत: भागवत कराड

कोरोनामुळे सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. अशा काळात प्रशासनावर विसंबून राहणे संयुक्तिक नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तिंनी पुढे येऊन प्रशासनाला मदत करणे गरजेचे आहे. या सामाजिक जाणीवेतून मी माझ्या परीने कोविड सेंटरला मदत करीत आहे. पुढेही मदत करण्या प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

– महेश देशमुख, बांधकाम व्यावसायिक, पेठसांगवी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here