जळगाव ः केंद्रातील भाजपा (BJP Government) सरकारने देशातील शेतकऱ्यांवर (Farmer) लादलेल्या तीन कृषिविषयक काळ्या कायद्याच्या (Law) मसुद्याचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजीत कार्यक्रमात दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष आमदार नाना पटोले (Congress state president MLA Nana Patole) यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टिकेची झोड उठविली. दरम्यान कोविड (covid-19) काळात जीवाची पर्वा न करता रूग्णसेवा करणार्‍या कोविड योध्यांचा प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.( congress burns anti-farmer black law)

Also Read: प्रदेश काँग्रेसचे पुढील अधिवेशन फैजपूरला होणार

प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा आज जिल्हा दौरा होता. या दौऱ्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांच्या उपस्थितीत शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या प्रतींचे दहन व काँग्रेस कार्यकर्ते कोविड योध्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस प्रवक्ते अतुलजी लोंढे, किसान सेलचे अध्यक्ष शाम पांडे, शोभाताई बोरस्ते, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी आ.रमेशदादा चौधरी, गटनेते प्रभाकर सोनवणे, ज्येष्ठ नेते डी.जी.पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी प्रदेश चिटणीस डी.जी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, जोत्सना विसपुते आधी मान्यवर उपस्थित होते.

मोदींनी देशाची अर्थव्यस्था मोडली
केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात कोरोना आला आणि देशाची अर्थवव्यस्था कोलमडली. त्यामुळे महागाई वाढून जनता त्रस्त झाली आहे. त्यात शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेतकरीही त्रस्त झाला आहे. खाद्य तेल असो अथवा इंधन यांच्या किंमती वाढवून मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटलयाची टीका केली. १५ लाखाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोंदीनी लॉकडाउन लावत लोकांना घरी बसवले. टाळया वाजवून, दिवे लावून कोविड झाला नसता तर रूग्णालयाची गरज भासली नसती कोविड परिस्थीतीत ऑक्सीजन, रेमेडीसिव्हर, बेड्सअभावी रुग्णांचा मृत्यू होत असतांना पंतप्रधान मोदीजी दुर्लक्ष केले. आणि त्यामुळे देशात दुसरी कोरोनाची लाट आली. याबाबात सोनीया गांधी, राहूल गांधींनी सुचना केल्या होत्या मात्र त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले.

Rally

Also Read: जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उतरता आलेख सुरूच

कोविड योध्यांचा सन्मान
गत वर्षापासून देशभरात कोविडचे संकट पसरले आहे. अशा संकट काळातही जीवाची पर्वा न करता अविरतपणे रूग्णसेवा करणार्‍या कोविड योध्यांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते कोविड योध्यांना प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार नाना पटोले यांनी कोविड योध्यांच्या कार्याचे कौतुक केले. सुत्रसंचालन एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here