ICC World Test Championship Final : ज्या दिवशी इंग्लंडच्या मैदानात माजी कर्णधार महेंद्र धोनीनं इतिहास रचला त्याच दिवशी विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. केन विल्यमसनच्या (Ken Williamson) नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने पहिली-वहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल जिंकत नवा विक्रम प्रस्थापित केला. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतील पहिली वहिली ट्रॉफी आणि मानाची गदा न्यूझीलंडने पटकावली आहे. 2009 मध्ये न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली होती. यावेळी त्यांना ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. 2015 आणि 2019 मध्येही न्यूझीलंडला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या लढतीमध्ये भारतीय संघ केवळ न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. न्यूझीलंडने मायदेशात दोन कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा दणका दिला. फायनलमध्येही तोच रुबाब कायम ठेवत त्रयस्त ठिकाणीही न्यूझीलंडने वर्चस्व दाखवून दिले. (Ken Williamson New Zealand Historic Win Against Virat Kohli Lead Team India And Lift First ICC World Championship Trophy)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकून पहिली-वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचे इरादे स्पष्ट केले होते. या विजयासह आयसीसी रँकिंगमध्ये त्यांनी टीम इंडियाला अव्वलस्थानावरुन खाली खेचले. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमुळे टीम इंडियापेक्षा त्यांना साउदम्टनच्या कसोटीत अधिक फायदा होईल, असा अंदाज होता. तो अंदाज अखेर खरा ठरला. दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या स्पर्धेतील पराभवाची मालिका कायम राहिली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना केला होता. त्यानंतर 2019 मध्ये इंग्लंडमध्ये न्यूझीलंडच्या संघाने सेमी फायनलमधून टीम इंडियाला आउट केले होते.

Also Read: WTC Final : भारतीय चाहत्यांकडून किवी खेळाडूंना अपशब्द

साउदम्टनच्या मैदानात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. पण तिसऱ्या दिवशी दोघेही लवकर माघारी फिरले. तळाच्या फलंदाजीत अश्विनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 217 धावा केल्या. न्यूझीलंडच्या संघाने कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 249 धावा केल्या. न्यूझीलंड संघाची 32 धावांची आघाडी पार करत टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांत आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला 139 धावांचे लक्ष मिळाले होते. केन विल्यमसनची नाबाद 52 धावांची खेळी आणि रॉस टेलरने 100 चेंडूत 47 धावांची त्याला दिलेली साथ याच्या जोरावर न्यूझीलंडने मेगा फायनलमध्ये 8 गडी राखून विजय नोंदवला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here