धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ज्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली त्याच दिवशी टीम इंडिया पहिल्या वहिल्या वर्ल्ड चॅम्पियशिपसाठी मैदानात उतरली आहे. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतील पराभवाची मालिका कायम राहणार की साउदम्टनच्या मैदानात विराट ब्रिगेडही धोनीप्रमणेच इतिहास घडवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय संघाचा पहिला डाव 217 आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने 249 धावांसह 32 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाचा डाव 170 धावांत आटोपला आणि न्यूझीलंडच्या संघाला पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अवघ्या 139 धावांचे आव्हान मिळाले.

तगड्या फलंदाजांचा भरणा असलेल्या टीम इंडियाची किवी गोलंदाजांसमोर केविलवाणी परिस्थिती झाली. त्यांची ही परिस्थिती पाहताना अनेक क्रिकेट चाहत्यांना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील दिमाखदार आणि ऐतिहासिक विजयाच्या आठवणी जाग्या झाल्या असतील. 23 जून 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या स्पर्धेसह आयसीसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकणारा धोनी पहिला वहिला कर्णधार ठरला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकला आहे.

Also Read: WTC Final : भारतीय चाहत्यांकडून किवी खेळाडूंना अपशब्द

2०13 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कमालीचा योगायोग

2013 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप यात कमालीचा योगायोग आहे. 2013 च्या फायनलमध्येही पावसाने सामन्यात खेळखंडोबा केला. त्यामुळे 50 षटकांचा अंतिम सामना 20-20 स्वरुपात खेळवण्यात आला. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या फायनलचा सामना हा इंग्लंडमधील बर्मिंगहॅमच्या मैदानात रंगला होता. पावसामुळे सामन्याचे चित्र बदलले आणि सामना यजमान इंग्लंडच्या बाजूने झुकला. इंग्लंडने परिस्थितीचा फायदा उठवत पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली आणि भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 षटकात 129 धावा केल्या. इंग्लंडच्या संघाला 124 धावात रोखत धोनीने आपल्या नावे खास विक्रम केला होता.

Also Read: VIDEO : साउदीच्या उसळत्या चेंडूवर विराट गडबडला!

अश्विनन जिंकला होता धोनीचा भरवसा

अखेरच्या षटकात 15 धावांची आवश्यकता असताना धोनीने जलदगतीसाठी नंदनवन समजल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर अश्विनच्या हाती चेंडू सोपवून सर्वांनाच आश्चर्यचकित करुन सोडले. अश्विनने धोनीचा विश्वास सार्थ करुन दाखवला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही अश्विनवर नजरा

वर्ल्ड टेस्ट फायनलमध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघ मजबूत स्थितीत दिसत असला तरी अश्विनने पहिल्या दोन विकेट घेत टीम इंडिया सहजासहजी हार मानणार नाही, असे संकेतच दिले आहेत. 2013 मध्ये धोनीचा विश्वास सार्थ ठरवलेला अश्विन सामना भारताच्या बाजूने वळवणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here