नवी दिल्ली – कोरोना काळामध्ये (Corona Period) माध्यमांतून (Media) प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचे (News) महत्त्व (Importance) आणखी वाढले असून जगभरातील ४४ टक्के लोकांनी आम्ही बहुसंख्यवेळा बातम्यांमधील माहितीवरच विश्‍वास 9Trust) ठेवतो, असे म्हटले आहे. भारतामध्ये मात्र हे प्रमाण सरासरीपेक्षाही कमी म्हणजे ३८ टक्के एवढेच असल्याचे नव्या सर्वेक्षणातून (Survey) उघड झाले आहे. भारतातील बहुसंख्य लोकांचा मुद्रीत माध्यमांवरच अधिक विश्‍वास असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून येते. (Readers Flourish Only in Print Media Royters Institute Survey)

या क्रमवारीमध्ये फिनलंड आघाडीवर असून येथील ६५ लोकांनी आमचा माध्यमांतील बातम्यांवर विश्‍वास असल्याचे म्हटले आहे. अमेरिका मात्र तळाला असून येथे हे प्रमाण ३८ टक्के एवढे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर दि स्टडी ऑफ जर्नालिझम’ने ४६ देशांमध्ये सर्वेक्षण केले होते त्यात भारताचा क्रमांक मात्र तळातील देशांमध्ये आहे. भारतामध्ये विश्वासार्हतेचा विचार केला तर मुद्रित माध्यमे, सरकारी माध्यमे असणारे दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर लोकांचा अधिक विश्‍वास असल्याचे दिसून आले आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांपेक्षाही मुद्रित माध्यमे ही विश्‍वासार्ह आहेत. ध्रुवीकरण आणि सनसनाटीपणामुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या विश्‍वासार्हतेला धक्का पोचला आहे.

सोशल मीडियात हे भारी

भारतामध्ये फेसबुक, ट्विटर, युट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बातम्या पाहताना लोकांचा ओढा हा सेलिब्रिटी आणि प्रभावशाली मंडळींकडे अधिक असल्याचे दिसून आले आहे. इंटरनेटवर प्रभाव गाजविणाऱ्या मंडळींनंतर मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि पत्रकार, राजकीय नेते आणि कार्यकर्ते, लहान आणि पर्यायी वृत्तस्रोत यावर सामान्य लोक हे बातम्यांसाठी अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणामध्ये केवळ इंग्रजी भाषक ऑनलाइन न्यूज यूजर्सचीच पाहणी करण्यात आली होती. अर्थात हा वाचकवर्ग तुलनेने खूप कमी असून भारतातील माध्यमांची बाजारपेठ खूप मोठी, व्यापक आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Also Read: ‘यूपी’ काबीज करायला काँग्रेस तयार; प्रियांका गांधी करणार नेतृत्व

आशिया प्रशांतश्रेणीमध्ये भारत आठव्या स्थानी असून ५० टक्क्यांसह थायलंड पहिल्यास्थानी आहे. खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत लोकांची चिंता यंदा वाढल्याचे दिसून आले आहे. ब्राझीलमध्ये हे प्रमाण ८२ टक्के तर जर्मनीमध्ये ३७ टक्के एवढे आहे असेही हे सर्वेक्षण सांगते. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या मंडळींनीच आम्हाला कोरोनाबाबत चुकीची माहिती मिळाल्याचा दावा केला असून हे प्रमाण यूजर्स नसणाऱ्यापेक्षा अधिक आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर चुकीच्या आणि खोट्या माहितीचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे.

देशातील माध्यम विश्‍वात

  • सोशल मीडियात सेलिब्रिटींचा मोठा दबदबा

  • फेसबुकवर पत्रकार, माध्यम संस्थांकडे ओढा

  • ट्विटरवर बातम्यांसाठी राजकीय नेत्यांकडे लक्ष

  • डिजिटल मीडियापेक्षाही दूरचित्रवाणी वाहिन्या लोकप्रिय

  • देशातील ७३ टक्के लोक स्मार्टफोनवर बातम्या पाहतात

  • संगणकावर बातम्या पाहणाऱ्यांचे प्रमाण हे ३७ टक्के

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here