लस घेऊन जाण्यासाठी पुण्यावरून अजून काही निरोप नसल्याने आज ( गुरूवारी) बहुतेक केंद्रे बंद राहणार आहेत.

सोलापूर : शहरातील आठ आणि ग्रामीणमधील दहा केंद्रांसह वाढीव 94 केंद्रांवर लसीकरण (vaccination) सुरू आहे. मंगळवारी (ता. 22) 17 हजार 458 जणांनी तर बुधवारी (ता. 23) जवळपास साडेतेरा हजार जणांनी लस टोचून घेतली. काही केंद्रांवरच आता लस शिल्लक असून आज लसीअभावी बहुतेक केंद्रांवरील लसीकरण बंदच राहील, अशी माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली. (vaccination has been suspended on thursday due to shortage of vaccines in solapur)

Also Read: पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत दुप्पट बालके बाधित

आतापर्यंत शहर-ग्रामीणमधील पाच लाख 41 हजार 775 जणांनी पहिला डोस टोचून घेतला आहे. तर एक लाख 24 हजार 225 जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण आता सुरू केल्याने जिल्ह्यासाठी मिळणारी लस कमी पडू लागली आहे. सध्या ग्रामीण भागातील 94 केंद्रांवर तर शहरातील आठ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी गर्दी वाढलेली असतानाही जिल्ह्यासाठी दोन-तीन दिवसाआड 20 ते 25 हजार डोस मिळत आहेत. लसीकरणासाठी तरूणांसह सर्वच व्यक्‍तींचा प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी दोन दिवसाआड किमान 40 हजारांपर्यंत लस मिळावी, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. लस घेऊन जाण्यासाठी पुण्यावरून अजून काही निरोप नसल्याने आज ( गुरूवारी) बहुतेक केंद्रे बंद राहणार आहेत.

Also Read: ‘या’ पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

साडेबारा हजार तरूणांचे एकाच दिवशी लसीकरण

18 ते 44 वयोगटाचे लसीकरण आता सुरू झाले आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन बुकिंग सुरू केल्यानंतर दीड तासांतच सर्व डोसची नोंदणी झाली होती. बुधवारी नोंदणी केलेल्या सर्वच तरूणांनी लस टोचून घेतली. सुमारे साडेबारा हजार तरूणांनी एकाच दिवशी लस टोचून घेतल्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही डॉ. पिंपळे यांनी आवर्जुन सांगितले. लसीकरणाचा वेग वाढल्याने जिल्ह्यासाठी वाढीव लस मिळावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (vaccination has been suspended on thursday due to shortage of vaccines in solapur)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here