बेलापूर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज (२४ जून) सिडकोला घेराव घालणार आहेत. अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई, पनवेल मुंबई, पुणे, ठाणे, पालघर येथून सुमारे 5 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी सिडको कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले आहेत. राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. दंगल नियंत्रण पोलीस पथकदेखील दाखल झाले आहे. रायगड, ठाणे, पालघर, जिल्ह्यतील जवळपास 1 लाख प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आजच्या घेराव आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. (Navi Mumbai Airport Naming Issue Many roads on Sion Belapur Highway Closed use diversions Police force deployed)

Also Read: विमानतळाचा वाद चिघळणार? नवी मुंबईत मोठा पोलिस बंदोबस्त

आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे.

सायन-पनवेल हायवे बंद- कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुरुषार्थ पेट्रोलपंपाच्या समोरील उड्डाणपुलावरील मार्गिका खारघरच्या दिशेने बंद- पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल.

पुरूषार्थ पेट्रोलपंपाकडून वाहतूक तळोजाच्या दिशेने- मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल.

Also Read: राज्यात पुन्हा कडक निर्बंध?; दोन दिवसांत निर्णय

सिडकोला घेराव आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यूहरचना केली आहे. प्रत्येक स्पॉटवर 1 डीसीपी, 1 एसीपी, दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत 12 पोलीस कर्मचारी असणार आहेत. पोलीस आयुक्त, स्थानिक पोलीस उपायुक्त हे स्पॉटवर सतत फेरफटका मारत राहणार आहेत. नवी मुंबई महापालिका मुख्यालय, सायन पनवेल महामार्गावर खारघर, सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे पोलीस बंदोबस्तासह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण दल तैनात करण्यात आले आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here