विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळात घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने परीक्षेचे नियोजन केले आहे.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची (solapur university) सत्र परीक्षा (Session Exam) 5 जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित 110 महाविद्यालयांमधील तब्बल 62 हजार विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा (Online exam) देतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. विकास कदम यांनी दिली. कोरोनामुळे ही सत्र परीक्षा ऑनलाइन होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (the session examination of solapur university will start from 5 th july)

Also Read: पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत दुप्पट बालके बाधित

अभियांत्रिकी, फार्मसी, विज्ञान, कला, वाणिज्य, बीएड, लॉ अशा विविध अभ्यासक्रमाची परीक्षा जुलै-ऑगस्ट या काळात होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातून अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळात घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने परीक्षेचे नियोजन केले आहे. दरम्यान, परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 28 जूनपर्यंत आहे. त्यात बीएड आणि लॉच्या विद्यार्थ्यांसाठी 23 जूनपर्यंत तर उर्वरित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना 28 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Also Read: लस संपल्याने सोलापुरात आज बहुतेक केंद्रांवरील लसीकरण बंदच

या कालावधीत अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारून पुढील दोन दिवस मुदत वाढविली जाईल, असेही डॉ. कदम म्हणाले. आगामी सत्र लवकर सुरू होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे नियोजन विद्यापीठाने केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही, त्यांची परीक्षा पुढे घेतली जाणार आहे.

Also Read: ‘या’ पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

ठळक बाबी…

– 5 जुलै ते 21 ऑगस्टदरम्यान 2020-21 मध्ये कोरोनामुळे राहिलेली सत्र परीक्षा

– विद्यापीठासह संलग्नित 110 महाविद्यालयांमधील 62 हजार विद्यार्थी देणार परीक्षा

– 50 प्रश्‍नांची एक प्रश्‍नपत्रिका; पेपर सोडविण्यासाठी एक तासाची वेळ

– परीक्षेत पारदर्शकता यावी म्हणून विद्यापीठ वापरणार प्रॉक्‍टिरिंग प्रणाली

– ऑगस्टअखेर निकाल होईल जाहीर; सप्टेंबरपासून नव्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया

Also Read: सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सत्र परीक्षेचे नियोजन केले आहे. कोरोना काळात अन्य विद्यापीठांच्या तुलनेत परीक्षा अन्‌ निकाल जाहीर करण्यात आपले विद्यापीठ अव्वल राहिले आहे.

– डॉ. विकास कदम, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

(the session examination of solapur university will start from 5 th july)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here