स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत वटपौर्णिमा साजरी होणार आहे.
शिर्केपाटील कुटुंबाने एकत्र येऊन साजरा वटपौर्णिमा केली. गौरीची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे विशेष उत्साह पाहायला मिळाला.या मालिकेमध्ये मराठी चित्रपटसृष्टी मधील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी नंदिनी यशवंत शिर्के-पाटिल म्हणजेच ‘माई’ यांची भूमिका साकरली आहे.या मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे.अभिनेत्री गिरीजा प्रभू ने या मालिकेमध्ये गौरी ही मुख्य भूमिका साकारली आहे.सायली साळूंखे, माधवी निमकर, सुनील गोडसे, मिनाक्षी राठोड या कलाकारांनी या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. जयदीप ही भूमिका साकारणारा अभिनेता मंदार जाधवच्या या मालिकेमधील अभिनयाला विशेष पसंती मिळाली आहे.या मालिकेच्या कथानकामुळे आणि मालिकेमधील कलाकरांच्या अभिनयामुळे या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.