राजापूर ( रत्नागिरी ) – भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून विहिरीत बिबट्या पडल्याची घडना तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडी येथे बुधवारी (ता. 18) घडली. वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील बिबट्याला सुखरूप बाहेर काढून त्याला नैसगिक अधिवासामध्ये सोडले. हा बिबट्या मादी सुमारे एक वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडी येथील संतोष शंकर दर्पे आज सकाळी शेतमळ्यातील विहिरीवर बसविलेला पाण्याचा पंप सुरू केला. मात्र त्यावेळी पंपाला पाणी येत नव्हते. त्यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता त्यांना विहिरीत बिबट्या असल्याचे दिसले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना देताना वनविभागालाही माहिती दिली.
ही माहिती लोकांच्या कर्णोपकर्णी होताच लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीकडे धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर काही वेळानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने चिपळून वनअधिकारी रमाकांत भवर, वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, राजापूरचे वनपाल एस. व्ही. घाटगे, वनपाल संजय रणधीर, कर्मचारी दीपक म्हादये, विजय म्हादये, दीपक चव्हाण आदींनी बिबट्याला पिंजरा सोडून विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. पिंजऱ्यामध्ये पडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले.
दोन महिन्यातील पाचवी घटना
शेजवली-कोंड्ये भागामध्ये बिबट्या किंवा त्याची पिल्ले आढळण्याची वा वनविभागाकडून त्यांना जेरबंद करण्याच्या गेल्या दोन महिन्यांमध्ये सातत्याने घटना घडत आहे. विहिरीमध्ये बिबट्या पडून त्याला जेरबंद करण्याची या परिसरातील गेल्या दोन महिन्यातील पाचवी घटना घडली आहे.

News Story Feeds