सचिनने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कुठे चूक झाली आणि कसा सामना गमावला हे सांगितलं आहे. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केले आहे.

नवी दिल्ली – भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. पावसामुळे राखीव दिवसापर्यंत खेळवला गेला. भारताची गेल्या दोन वर्षात कसोटीतील कामगिरी सर्वात चांगली होती. सर्वाधिक 12 कसोटी जिंकल्यानंतरही त्यांना अंतिम सामन्यात मात्र जिंकता आलं नाही. यामुळे पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी विजेतेपद मिळण्यात अपयश आलं. सलग तिसऱ्यांदा भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेत पराभव पत्करावा लागला आहे. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडूनच पराभव पत्करावा लागला होता. तर त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं. दरम्यान, भारताने हा सामना 10 चेंडूत गमावल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

सचिनने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कुठे चूक झाली आणि कसा सामना गमावला हे सांगितलं आहे. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केले आहे. तु्म्ही एका चांगल्या संघाप्रमाणे खेळलात. भारतीय संघ स्वत:च्या कामगिरीवर नक्कीच नाराज असेल. मी याआधीच म्हटलं होतं की, शेवटच्या दिवशी पहिली दहा षटके महत्त्वाची असणार आहेत. सामन्याचा कल काय असेल हे पहिल्या सत्रात ठरेल. इथंच भारताचे कोहली आणि पुजारा हे दोन फलंदाज 10 चेंडुत बाद झाले. यामुळे संघावर दबाव वाढला असं सचिनने म्हटलं आहे.

Also Read: WTC – विराटने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण

दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या पराभवाचं खापर पावसावर फोडलं आहे. विराट म्हणाला की, पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने वाया गेला होता. त्यानंतर जेव्हा खेळ सुरु झाला तेव्हा पुन्हा जम बसवणं कठीण होतं. आम्ही फक्त तीन विकेट गमावल्या. जर पावसाचा व्यत्यय आला नसता तर आमच्या आणखी धावा झाल्या असत्या.

अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानं राखीव दिवसापर्यंत कसोटी खेळवण्यात आली. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ सामन्यात होऊ शकला नाही. तसंच 23 जूनला राखीव दिवशी खेळताना भारतीय संघाच्या 2 बाद 64 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 100 धावात भारताचे 8 फलंदाज बाद झाले. तसंच भारताकडून एकाही फलंदाजाला 50 धावांचा आकडा पार करता आला नाही.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here