दांडेकर पूल : आंबिल ओढ्याच्या काठच्या घरांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई.
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करत असताना स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत

यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा निषेध करताना

यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा निषेध करताना
यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा निषेध करताना
घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या देखरेखीखाली अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु आहे.
एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट असल्याचा आरोप किशोर कांबळे यांनी केला आहे.
अचानक अतिक्रमण कारवाई सुरु झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहे.
कोणतीही पूर्वसुचना न देता अतिक्रमण कारवाई केल्याचा आरोप नागरिक करत आहे.नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईला तीव्र विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे.

अतिक्रमण कारवाईमुळे घरातील समान बाहेर काढत दुसरीकडे हलविण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे.

परिसरातील अतिक्रमण कारवाई सुरू झाली असून काही घरे जमीनदोस्त झाली आहे. कित्येक वर्षांपासून राहात असलेली घरे क्षणात माती झाल्यान नागरिक भावूक होत आहेत
जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सोशल डिस्टसिंगच्या फज्जा उडाला आहे
वृध्द आणि महिलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम नागरिक करत आहेत.
अतिक्रमण कारवाईला नागरिक विरोध करत असल्याने परिसरात कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे
नागरिक घरातील समान सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न करत आहे.
नागरिकांच्या घरातील सामान रस्त्यावर पडले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here