विक्री व्यवस्थेतील दलालांची साखळी तोडून थेट शेतकरी ते खरेदीदार यांच्यात चोख व्यवहार सुरु झाल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होवू लागला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : केंद्राच्या ‌नव्या कृषी धोरणाचे सकारात्मक ‌परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी ते खरेदीदार यांच्यातील सौहार्दपू्र्ण व्यवहारामुळे शेत माल विक्रीला अधिक गती मिळाली ‌आहे. (Laxman Shirsat pomegranate from Pandharpur is in demand in Kerala)

Also Read: पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत दुप्पट बालके बाधित

पंढरपूर जवळच्या आढीव येथील शेतकरी व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या भगव्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी मिळाली आहे. प्रति किलो 70 रुपये दराने 25 टन डाळिंबाची बांधावर बसून‌ त्यांनी थेट पर राज्यात विक्री‌ केली आहे. विक्री व्यवस्थेतील दलालांची साखळी तोडून थेट शेतकरी ते खरेदीदार यांच्यात चोख व्यवहार सुरु झाल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होवू लागला आहे.

Also Read: सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

लक्ष्मण शिरसट यांची आढीव येथे 20 एकर कोरडवाहू शेती आहे. अत्यल्प पाणी असल्याने त्यांनी खडकाळ माळरानात चार एकर डाळिंब व दोन एकर केशर आंब्याची लागवड केली आहे. गतवर्षी त्यांनी युरोपात डाळिंबाची निर्यात केली होती. यावर्षी कोरोना आणि सततच्या हवामान बदलामुळे निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेता आले नाही. तरीही पाणी, खतांचे योग्य नियोजन करुन त्यांनी‌ या वर्षी ‌डाळिंबाचे भरघोस उत्पन्न घेतले आहे. तीन एकर बागेतील डाळिंबाची तोडणी‌ झाली‌ आहे.

Also Read: लस संपल्याने सोलापुरात आज बहुतेक केंद्रांवरील लसीकरण बंदच

बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे लाल चुटूक आणि रसाळ डाळिंबा फळांना मागणी वाढली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शेतीमालाचे दर पडले आहेत. त्यामुळे कवडीमोल भावाने शेतीमालाची विक्री करावी लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

Also Read: अकरा हजार डोसचे दीड तासात बुकिंग! 94 केंद्रांवरून आज लसीकरण

कोरोनाचा प्रादु्र्भाव कमी होत असल्याने पुन्हा शेतीमालाची खरेदी विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे बाजारात डाळिंबाचे भाव वधारले आहेत. त्यातच थेट शेतकरी ते खरेदीदार यांच्यात व्यवहार सुरु झाल्याने शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळू लागले आहेत.

Also Read: ‘डीसीसी’ने शिक्षकांसाठी वाढविली कर्ज मर्यादा! वेतनावर 40 लाखांचे कर्ज

श्री. शिरसट यांच्या तीन एकर डाळिंब बागेतील 25 टन डाळिंबाची केरळ येथील व्यापाऱ्याला जागेवरती विक्री केली आहे. डाळिंब विक्रीतून 17 लाख रुपये हाती आले आहेत. 5 लाख रुपयांचा डाळिंब उत्पादनाचा खर्च वजा जाता त्यांना 12 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. जिद्द, मेहनत आणि बाजारपेठेचे ज्ञान अवगत केल्यास डाळिंब शेतीतून चांगले पैसे मिळू शकतात, हे लक्ष्मण शिरसट यांनी आपल्या डाळिंब शेतीच्या प्रयोगातून सिध्द केले आहे. (Laxman Shirsat pomegranate from Pandharpur is in demand in Kerala)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here