नाशिक : वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो. वटपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून नाशिक शहर आणि जिल्ह्यात निर्माल्य दान उपक्रमाचे तनिष्का गटांतर्फे आयोजन करण्यात आले होते. तसेच पूजेच्या ठिकाणी जमा होणारा कचरा आणि निर्माल्य एकत्रित करत तनिष्का भगिनींतर्फे परिसर स्वच्छ राखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला.

विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून नाशिक शहर आणि जिल्ह्यात निर्माल्य दान उपक्रमाचे तनिष्का गटांतर्फे आयोजन करण्यात आले होते. तसेच पूजेच्या ठिकाणी जमा होणारा कचरा आणि निर्माल्य एकत्रित करत तनिष्का भगिनींतर्फे परिसर स्वच्छ राखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला.
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या वटवृक्षाची पूजा करुन स्त्रिया “मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य आणि मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे”, अशी प्रार्थना करतात
जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर व्रताची सुरुवात करतात. या दिवशी श्रृंगार करतात. त्यानंतर वट वृक्षाची पूजा करतात. वडाला फुले, वाण, पाणी देत त्याभोवती परिक्रमा करावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात
वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते. त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते. याबरोबरच एकमेकींना वाण दिल्याने आपल्याकडून दान केले जाते असेही म्हणतात.
वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षांसाठी जगते त्याचप्रमाणे आपला पतीही दिर्घायुषी व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवल्यास ते वाचते असाही समज आहे

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here